TWITTER : राहुल गांधींनी अनेक नेत्यांना केलं अनफॅालो..

फॅालो करण्यावरुन कॅाग्रेसच्याकाही नेत्यानीअनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते
Sarkarnama Banner - 2021-06-03T111517.571.jpg
Sarkarnama Banner - 2021-06-03T111517.571.jpg

नवी दिल्ली : कॅाग्रेसचे नेते राहुल गांधी सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतात. राहुल गांधी rahul gandhi हे काही दिवसापासून अनेक नेत्यांना टि्वटवरुन अनफॅालो करीत असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. गेल्या दोन-तीन दिवसात काही पत्रकार, नेते यांना राहुल गांधींनी अनफॅालो केले आहे. rahul gandhi unfollowed many leaders on twitter

याबाबत कॅाग्रेसच्या आयटी टीमने खुलासा केला आहे की, राहुल गांधी यांचे टि्वटर अंकाउटला रिफ्रेश करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुन्हा फॅालो करण्यात येणार आहे. ज्या व्यक्तींना राहुल गांधी यांच्या टि्वटवरुन अनफॅालो करण्यात आले आहे त्यात प्रामुख्याने त्यांच्या कार्यालयातील व्यक्ती, कर्मचारी, सहकारी यांचा समावेश आहे. तर पक्षाच्या काही नेत्यानी या कर्मचाऱ्यांना फॅालो करण्यावरुन अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच ज्या नेत्यांचा मृत्यू झाला आहे असे तरुण गोगाई, अहमद पटेल, राजीव सातव यांना अनफॅालो करण्यात आले आहे.

राहुल गांधी यांच्या टि्वटवर फॅालो करण्याच्या संख्येत बदल होत आहे. मंगळवारी सकाळी राहुल गांधी यांना २८१ जण फॅालो करीत होते. तर सांयकाळी ही संख्या कमी झाली. बुधवारी ही संख्या २१९ वर आली. पण या दरम्यान राहुल गांधी हे टि्वटवर अॅक्टीव्ह होते. 

भायखळा (मुंबई) : कुंपणाने शेत खाल्ले तर दाद कुणाकडं मागायची, रक्षणकर्तेच जर चोर निघाले तर, न्याय कुणाकडे मागायचा, असा प्रश्न भायखळा येथील नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे. सर्वसामान्य नागरिकांना पोलिस असल्याची बतावणी करून लुटण्याच्या घटना वाढल्या असतानाच यामध्ये आता खरे पोलिसही  सहभागी झाल्याची घटना घडली आहे. 
 मुंबईतील भायखळा येथे एका सोने व्यापाऱ्याचे अडीच किलो सोने लंपास करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली असून यामध्ये एका खऱ्या पोलिसाचा समावेश आहे. खलील शेख असं या पोलिसाचे नाव असून तो कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहे.
Edited by : Mangesh Mahale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com