राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर साधला पुन्हा निशाना...

राहुल गांधी आपल्या टि्वटमध्ये म्हणतात, ''असं काय झालं की मोदींजी असताना भारत मातेची पवित्र जमीन चीनने हिसकावून घेतली.''
2Delhi_Rahul_Gandhi_takes_PM.jpg
2Delhi_Rahul_Gandhi_takes_PM.jpg

नवी दिल्ली : भारत-चीन संघर्षावरून पुन्हा एकदा कॅाग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाना साधला आहे. एका न्यूजपोर्टलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मोंदीवर टिका केली आहे. याबाबत राहुल गांधी यांनी टि्वट केले आहे. ते आपल्या टि्वटमध्ये  म्हणतात, ''असं काय झालं की मोदींजी असताना भारत मातेची पवित्र जमीन चीनने हिसकावून घेतली.''   

भारत-चीनमधील संघर्षात आता दोन्ही देश आपले सैन्य मागे घेत असताना राहुल गांधी यांनी हे टि्वट केले आहे. परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी सांगितले की दोन्ही देशांनी सीमेवरील आपले सैन्य मागे घेण्यास सहमती दर्शवली आहे. याबाबतची प्रक्रीया सध्या सुरू आहे. सध्या दोन्ही देशामध्ये तणावाचे वातावरण आहे. हा तणाव कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.''

दोन दिवासापूर्वी भारत-चीन यांच्यात वरिष्ठ पातळीवर बैठक झाली. यात पूर्व लडाख येथील सैन्य मागे घेण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. नियोजनबद्धपद्धतीने याबाबतची प्रक्रीया सुरू झाली आहे. दोन्ही देशातील कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दोन्ही देशातील वरिष्ठ कमांडर यांची लवकरच बैठक होणार आहे. सीमेवरील सैन्य पूर्ण मागे घेण्यात येणार आहे. येत्या आठवड्यात ही बैठक होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि चीनी विदेशी मंत्री वांग यी की यांनी याबाबत आज फोनवर सुमारे दोन तास चर्चा केली. सोमवारी सकाळी सैनिक सीमेवरून मागे घेण्याची प्रक्रीया सुरू होणार आहे. जयशंकर यांनी ता. 17 जून रोजी चीनच्या विदेश मंत्र्यांशी फोनवरून संवाद साधला होता. सीमेवर दोन महिन्यापासून तणाव निर्माण झाला आहे. याबाबत त्यांनी चर्चा केली होती. ता. 15 जून रोजी गल्वान खोऱ्यात झालेल्या हल्ल्यात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. त्यानंतर तणाव वाढला होता. 
 

हेही वाचा : कॅाग्रेसने सोपवली हार्दीक पटेल यांच्यावर मोठी जबाबदारी...  

पुणे : पाटीदार समाजाला आरक्षण मिळण्यासाठी गुजरातमध्ये मोठं आंदोलन झालं होतं. या आंदोलनाचा मुख्य चेहरा हार्दीक पटेल होता. हार्दिक पटेल यांना आता कॅाग्रेसने मोठी जबाबदारी दिली आहे. गुजरात कॅाग्रेस कार्याध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुजरातमध्ये आपली ताकद वाढविण्यासाठी कॅाग्रेसने हार्दीक पटेल यांच्यामाध्यमातून नवा युवा चेहरा दिला आहे. हार्दिक पटेल यांची तत्काळ नियुक्ती करायला परवानगी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी दिली असल्याची माहिती काँग्रेसचे संघटना महासचिव केसी वेणुगोपाल यांनी दिली. सध्या अमित चावडा हे गुजरात कॅाग्रेसचे अध्यक्ष आहेत.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com