लस, ऑक्सिजन, औषधांसोबत मोदी देखील गायब..राहुल गांधींचा टोला

आता फक्त सेंट्रल व्हिस्टा, औषधांवर, जीएसटी आणि इतरत्र पंतप्रधानांचे फोटो उरले आहेत,
4Sarkarnama_20Banner_20_202021_04_22T164950.481_0.jpg
4Sarkarnama_20Banner_20_202021_04_22T164950.481_0.jpg

नवी दिल्ली : कोरोना संकट काळात केंद्र सरकारवर प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काँग्रेसकडून सातत्याने टीका होत आहे. कोरोनाची दुसरी लाटेने देशातील अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. कोरोनाचा रोखण्यासाठी केंद्र सरकारचे सर्व प्रयत्न अयशस्वी  ठरत आहे. कॅाग्रेसचे नेते राहुल गांधी  Rahul Gandhiदररोज टि्वट करुन त्यांच्यावर निशाणा साधत आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या, लस, ऑक्सिजन टंचाई, यावरुन पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी मोंदीवर Narendra Modi  हल्लाबोल केला आहे. Rahul Gandhi target on Prime Minister Narendra Modi Central Vista

टि्वटकरुन मोदींवर राहुल गांधी यांनी टीका केली आहे.  लस, ऑक्सिजन आणि औषधांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील गायब झाल्याचा टोला लगावला आहे. ते आपल्या टि्वटमध्ये म्हणतात की, आता फक्त सेंट्रल व्हिस्टा, औषधांवर, जीएसटी आणि इतरत्र पंतप्रधानांचे फोटो उरले आहेत, सरकार मात्र स्वतःच्या जबाबदारी पासून पळ काढत आहे. त्यामुळे गरजूंसाठी आता लोकांनीच एकत्र येऊन मदतीसाठी पुढाकार घ्यावा. भारताने एकजुटीने उभे राहावे.

कोरोना संकट काळात केंद्र सरकारवर प्रामुख्याने पंतप्रधान मोदींवर काँग्रेसकडून सातत्याने निष्क्रियतेचा आरोप होतो आहे. त्यापार्श्वभूमीवर काँग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयुआयने काल गृहमंत्री अमित शहा हरविल्याची तक्रार दिल्ली पोलिसांकडे केली होती. त्यानंतर आज राहुल यांनी ट्विटद्वारे मोदींवर शरसंधान केले. 
 

नवी दिल्ली  : भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या कारणावरुन सत्ताधारी आणि विरोधक एकमेंकावर आरोप-प्रत्यारोप करीत आहे. या आरोप-प्रत्यारोपात जागतिक आरोग्य संघटनेने WHO (डब्लूएचओ) प्रसिद्ध केलेल्या अहवालात  भारतात वेगानं वाढत असलेल्या कोरोनाची कारणे स्पष्ट केली आहेत.  देशात पाच राज्यात काही दिवसापूर्वी निवडणूका झाल्या. भारतात निवडणूक प्रचार आणि धार्मिक कार्यक्रमांमुळे कोरोनाचा ‘बी.१.६१७’ हा प्रकार मोठ्या प्रमाणात फैलावण्यास मदत झाली. ‘बी.१.१.७’ या प्रकाराचा कोरोना विषाणू ब्रिटनमध्ये प्रथम आढळला आणि आता अमेरिकेत त्याचा प्रसार झाला आहे. बी. १.६१७ हा जास्त धोकादायक आहे, हे अद्याप सिद्ध झालेले नाही. पण अनुवांशिक क्रमवारीचा अभ्यास मोठ्या प्रमाणात झाल्याशिवाय कोरोना साथीच्या फैलावाला या अवताराला दोष देता येणार नाही, ‘डब्लूएचओ’च्या तज्ज्ञांनी स्पष्ट केले.राजकीय कार्यक्रमांमुळे झालेली गर्दी हे भारतातील कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याचे एक प्रमुख कारण असल्याचे  जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ)ने आपल्या अहवालात स्पष्ट केलं आहे. डब्लूएचओनं कोरोनासंदर्भात जाहीर केलेल्या साप्ताहीक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. 

Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com