West Bengal Election : राहुल गांधींनी 'करून दाखवलं'! इतर नेत्यांनाही केलं आवाहन...

महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली, मध्य प्रदेश, गुजरात अशा अनेक राज्यांमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे.
Rahul Gandhi suspends his all public rallies in West Bengal
Rahul Gandhi suspends his all public rallies in West Bengal

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा संसर्ग वेगात वाढत चालला असून एका दिवसातील नवीन रुग्णांचा आकडा अडीच लाखांच्या पुढे गेला आहे. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली, मध्य प्रदेश, गुजरात अशा अनेक राज्यांमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. त्यातच उत्तराखंडमध्ये सुरू असलेला कुंभमेळा आणि बंगालमधील निवडणूक प्रचारावर अनेकांनी टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळा प्रतिकात्मक करून संपवावा, असे आवाहन केले आहे. मात्र, बंगालमधील निवडणूक प्रचारांमध्ये होत असलेल्या गर्दीवर ते बोलत नसल्याची टीका सोशल मीडियावर सुरू आहे. पंतप्रधानांसह गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक नेत्यांच्या सभा, रोड शोला मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे बंगालमध्येही कोरोना रुग्णांचा आकडा वाढू लागला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही नुकतीच सभा घेतली. 

काँग्रेसकडून कोरोना रोखण्यासाठी केंद्र सरकारला कठोर उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यातच आता राहुल गांधी यांनी बंगालमधील त्यांच्या सर्व सभा रद्द करण्याची घोषणा आज केली. कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेऊन या सभा रद्द केल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच सध्याच्या परिस्थिती मोठ्या सभा न घेण्याचे आवाहनही त्यांनी इतर पक्षांच्या नेत्यांना केले आहे. 

काँग्रेसकडून शनिवारी पंतप्रधान मोदी यांच्याविरोधातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्यात आला होता. त्यामध्ये कोरोनाचा कहर सुरू असतानाही पंतप्रधान मोदी प्रचार सभा घेत असल्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम यांनी आरोप केला की, पंतप्रधान कोरोना संकटाशी लढण्याऐवजी प्रचारातून संवेदनहीनता दाखवत आहेत. त्यांनी दिल्लीत राहून आपले काम करायला हवे. 

दरम्यान, बंगालमधील प्रचार सभा व रोड शोला होणाऱ्या गर्दीमुळे रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही निवडणुकीतील पुढील टप्प्यांतील मतदान एकाच दिवशी घेण्याचे आवाहन निवडणूक आयोगाला केले आहे. पण त्यावर आयोगाकडून असा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच भाजपकडून निवडणुकीमुळे कोरोना वाढत नसल्याचा दावा आयोगाकडे केला आहे. ठरलेल्या तारखांनाच मतदान घेण्यात यावे, असे पत्र भाजपकडून आयोगाला देण्यात आले आहे.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com