''कोरोनासमोर नरेंद्र मोदींचे आत्मसमर्पण...''

राहुल गांधी यांनी आता कोरोनाशी मुकाबला करताना नरेंद्र मोदी अपयशी ठरत असल्याचे सांगून पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी यांच्याकडे कोरोनाला हरविण्यासाठी कोणतेही योजना नसल्याचे गांधी यांनी म्हटले आहे.
1Narendra_20Modi_Rahul_20Gandhi
1Narendra_20Modi_Rahul_20Gandhi

नवी दिल्ली  : भारत-चीन संघर्षात 20 जवान शहीद झाले, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सतत प्रश्न विचारणारे कॅाग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आता कोरोनाशी मुकाबला करताना नरेंद्र मोदी अपयशी ठरत असल्याचे सांगून पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी यांच्याकडे कोरोनाला हरविण्यासाठी कोणतेही योजना नसल्याचे गांधी यांनी म्हटले आहे.

याबाबत राहुल गांधी यांनी एक टि्वट केले आहे. या टि्वटमध्ये राहुल गांधी म्हणतात, ''कोरोनाचे संक्रमण देशात सर्वत्र पसरले आहे. केंद्र सरकारकडे कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी कोणतीही उपाययोजना नाही. पंतप्रधान याबाबत शांत आहेत. त्यांनी कोरोनासमोर आत्मसमर्पण केले आहे. कोरोनाशी लढण्यास त्यांनी नकार दिला आहे. सध्या देशातील कोरोनाबाधितांची संख्या पाच लाखपेक्षा जास्त झाली आहे. त्यात मोदी यांनी सांगितले होते की माहित नाही कोरोनापासून कधी सुटका होईल. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. 

'आत्मनिर्भर उत्तर प्रदेश रोजगार कार्यक्रम'त पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ''कोरोनापासून कधी सुटका मिळेल, याबाबत काही सांगता येणार नाही. सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क वापरणे ही दोनचं ओेषध सध्या कोरोनावर आहेत. जोपर्यंत कोरोनावर ओेषध निर्माण होत नाही, तोपर्यत ही दोन ओेषध आपल्याला कोरोनापासून वाचवू शकतील. ''केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशात शनिवारपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या सुमारे पाच लाखांपेक्षा अधिक आहे. तर आतापर्यंत 15 हजार 685 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यत दोन लाख 95 हजार 881 जण कोरोनातून मुक्त झाले आहेत.

हेही वाचा: राज्यात एकाच दिवसात आढळले कोरोनाचे पाच हजार रुग्ण 


मुंबई  : राज्यात आज (ता. 26 जून)  कोरोनाच्या ५०२४ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ६५ हजार ८२९ रुग्णांवर  उपचार सुरू आहेत. आज २३६२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ७९ हजार ८१५ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५२.२५ टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८ लाख ७१ हजार ८७५ नमुन्यांपैकी १ लाख ५२ हजार ७६५ नमुने पॉझिटिव्ह (१७.५२ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ५८ हजार  ४८८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. 

सध्या ३६ हजार ९०३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज १७५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी ९१ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित ८४ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर  ४.६५ टक्के एवढा आहे. मागील ४८ तासात झालेले ९१ मृत्यू हे मुंबई मनपा-४४, कल्याण-डोंबिवली मनपा-२, नाशिक-१. नाशिक मनपा-७, पुणे मनपा-१४, कोल्हापूर-१, औरंगाबाद मनपा-१४, लातूर-२, नांदेड मनपा-२, अकोला-१, अकोला मनपा-१, नागपूर मनपा-१, गोंदिया-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com