राहुल गांधी म्हणतात, "मोदीजी, थाळ्या वाजविण्यापेक्षा कोरोना वॅारियर्सचा सन्मान करा.." - Rahul Gandhi says Modiji respect the Corona Warriors rather than playing the drum | Politics Marathi News - Sarkarnama

राहुल गांधी म्हणतात, "मोदीजी, थाळ्या वाजविण्यापेक्षा कोरोना वॅारियर्सचा सन्मान करा.."

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर पुन्हा हल्ला केला आहे. 

नवी दिल्ली : कोरोनाशी मुकाबला करताना अनेक कोरोना योद्धा मृत्यूमूखी पडले. यांची आकडेवारी केंद्र सरकारकडं उपलब्ध नाही. यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टिका केली आहे. याबाबत राहुल गांधी यांनी टि्वट करून नरेंद्र मोदींना प्रश्न विचारले आहेत.

मोदी सरकारनं संसदेत सांगितलं होते की केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे कोरोनाशी मुकाबला करताना मृत्यू झालेले कोरोना योद्धा किती आहेत, याची यादी आमच्याकडे नाही. यावरून राहुल गांधी यांनी याबाबत वृत्त टि्वट करून मोदी सरकारवर पुन्हा हल्ला केला आहे. 

राहुल गांधी म्हणतात की थाळ्या वाजविणे, दिवे लावणे यापेक्षा कोरोना योद्धा यांची सुरक्षा आणि त्यांचा सन्मान महत्वाचा आहे. त्यांच्या मृत्यूबाबतची आकडेवारी केंद्र सरकारकडं नसणे हा कोरोना वॅारियर्सचा अपमान आहे. 

मंगळवारी केंद्रीय आरोग्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी राज्यसभेत माहिती देताना सांगितलं की कोरोनाशी मुकाबला करताना मृत्यू झालेले डॅाक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी यांच्याबाबतची माहिती नाही. ही माहिती राज्य पातळीवर राज्याच्या आरोग्य मंत्र्यालयाकडं असते. 

हेही वाचा : अकाली दल मोदी सरकारमधून बाहेर  
नवी दिल्ली : शेतकऱ्यासंदर्भातील वादग्रस्त विधेयक चौफेर विरोधाला न जुमानता मोदी सरकारने लोकसभेत पुढे रेटल्यानंतर संतप्त झालेला भारतीय जनता पक्षाचा सर्वांत जुना मित्रपक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाने केंद्र सरकारमधून बाहेर पडण्याचे अस्त्र उगारले आहे.अकाली दलाच्या केंद्रीय अन्नप्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी आज (ता. 17 सप्टेंबर) रात्री मंत्रिपदाचा राजीनामा पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविल्याचे वृत्त आहे. अकाली दलाने सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यामुळे शिवसेनेनंतर सर्वांत विश्‍वासू मित्रपक्ष लांब जाण्याचा धोका भाजपवर येण्याची चिन्हे आहेत. प्रकाशसिंग आणि सुखबीरसिंग या बादल पिता पुत्रांचे अकाली दल मोदी सरकारमधून बाहेर पडले असले तरी भाजप आघाडी मात्र या पक्षाने अद्याप सोडलेली नाही. एका वृत्तानुसार, सरकारला आपला पक्ष बाहेरून पाठिंबा देत राहील, असे बादल यांनी रात्री स्पष्ट केले आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख