मोदींच्या विरोधात बोलणारे दहशतवादी ठरतात...राहुल गांधींचा आरोप - rahul gandhi led congress delegation stopped by police while going to meet president over farm laws | Politics Marathi News - Sarkarnama

मोदींच्या विरोधात बोलणारे दहशतवादी ठरतात...राहुल गांधींचा आरोप

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 24 डिसेंबर 2020

राहुल गांधींसोबत काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद आणि अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली.

नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. काँग्रेसच्या शिष्टमंडळासह राहुल गांधी हे राष्ट्रपती भवन येथे जात असताना त्यांच्यासोबत प्रिंयका गांधी होत्या. पोलिसांनी मोर्चाला रस्त्यात अडवून प्रिंयका गांधी यांना ताब्यात घेतले होते. 

राष्ट्रपतींना भेटण्यासाठी फक्त तीनच नेत्यांना पोलिसांनी परवानगी देण्यात आली होती. राहुल गांधींसोबत काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद आणि अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. राष्ट्रपती कोविंद यांना भेटल्यावर शेतकऱ्यांच्या विविध मागण्याबाबतचे निवेदन राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींना दिले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. मोदींच्या विरोधात बोलणाऱ्या दहशतवादी ठरविले जात आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी यावेळी केली.

राहुल गांधी म्हणाले, ''कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नसल्याने केंद्र सरकारनं कृषी कायदे मागे घ्यावेत. देशात असे कृषी कायदे करणं म्हणजे गरीबांचा पैसा उद्योगपतींच्या खिशात घालण्याचा सरकारचा खेळ सुरू आहे.'' मोदी सरकारने केलेल्या कृषी कायद्याबाबत महिनाभरापासून शेतकरी दिल्लीच्या सीमावर आंदोलन करीत आहेत. कृषी कायदे रद्द करण्याबाबत राष्ट्रपतींना मध्यस्थी करावी, अशी मागणी यावेळी राहुल गांधींनी यावेळी केली. कोरोनाबाबत ते म्हणाले की सरकारने कोरोना रोखण्यासाठी वेळीच कठोर पावलं उचलले नाही, तर अनेकांचा जीव जाण्याची शक्यता आहे. सरकारनं कोरोनाला गार्भीयाने घेतले पाहिजे. 

   
हेही वाचा : जेटलींच्या पुतळ्याच्या मुद्द्यावरुन बिशनसिंग बेदींची नाराजी

नवी दिल्ली :  दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेने फिरोजशाह कोटला स्टेडियम परिसरात माजी अध्यक्ष अरूण जेटली यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यास विरोध करताना माझे सदस्यत्त्व रद्द करा, स्टॅंडला दिलेले माझे नाव काढून टाका अशी आक्रमक भूमिका बिशनसिंग बेदी यांनी घेतली आहे.दिल्ली संघटना घराणेशाहीस प्रोत्साहन देत आहे तसेच प्रशासकांना क्रिकेटपटूंपेक्षा जास्त महत्त्व देत असल्याचा आरोप बेदी यांनी केला. त्यांनी दिल्ली संघटनेचे अध्यक्ष रोहन जेटली यांना लिहिलेल्या पत्रात अरुण जेटली यांच्यावर टीका केली आहे. नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या जेटली यांचे गतवर्षी निधन झाले. मी खूप संयम बाळगतो, पण आता तो संपत चालला आहे. दिल्ली संघटनेने माझ्या सहनशक्तीचा अंत पाहिला आहे. त्यामुळे स्टॅंडवरुन तुम्ही माझे नाव काढणे, माझे सदस्यत्त्व रद्द करणेच योग्य होईल, असे बेदी यांनी पत्रात म्हंटले आहे. अरुण जेटली १४ वर्षे दिल्ली संघटनेचे अध्यक्ष होते.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख