राहुल गांधी, किमान "तुमच्या' पाकचे तरी ऐका : नड्डा - Rahul Gandhi, at least listen to "your" Pak: Nadda | Politics Marathi News - Sarkarnama

राहुल गांधी, किमान "तुमच्या' पाकचे तरी ऐका : नड्डा

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

 कॉंग्रेस नेते राहुल गांधी व विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. "कॉंग्रेसच्या शहजाद्याचा देशावर विश्‍वास नाही. त्यांनी आता त्यांचा विश्‍वासू देश पाकिस्तानचे म्हणणे तरी ऐकावे' असा टोला भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी लगावला आहे.

नवी दिल्ली ः मागच्या वर्षी फेब्रुवारीत पाकने पकडलेले हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना त्वरित सोडले नाही तर भारत त्या देशावर जबरदस्त हल्ला करण्याच्या तयारीत होता, या पाकिस्तानी संसदेत झालेल्या जाहीर खुलाशानंतर सत्तारूढ भाजपने कॉंग्रेस नेते राहुल गांधी व विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. "कॉंग्रेसच्या शहजाद्याचा देशावर विश्‍वास नाही. त्यांनी आता त्यांचा विश्‍वासू देश पाकिस्तानचे म्हणणे तरी ऐकावे' असा टोला भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी लगावला आहे.

पाकिस्तानचे खासदार सरदार अयाज सादिक यांनी माजी विदेशमंत्री शाह महमूद कुरेशी यांच्या हवाल्याने म्हटले की अभिनंदन याला त्वरित सोडले नाही तर भारत पाकिस्तानवर त्याच दिवशी रात्री 9 ला हल्ल्याच्या तयारीत आहे. खुदासाठी याला (अभिनंदन) सोडून द्या असे कुरेशी यांनी लष्कराला विनविले. 

हे ऐकताच पाक लष्करप्रमुख बाजवा घामाने डबडबले व त्यांचे पायही लटपटत होते. त्यांच्या वक्तव्यानंतर भाजपने कॉंग्रेसवर चौफेर हल्ला चढविला आहे. नड्डा यांनी ट्विटमध्ये म्हटले की कॉंग्रेसच्या शहजाद्याचा भारताचे लष्कर, सरकार व जनता या कशावरच विश्‍वास नाही. आता त्यांचा सर्वाधिक विस्वास असलेल्या पाकिस्तानचे ऐकले तर कदाचित त्यांचे डोळे उघडतील. कॉंग्रेस सतत आपल्याच देशाच्या शूर लष्करी सेनांना कमकुवत करण्याचा व त्यांचे मनोधैय खच्ची करण्याचा प्रयत्न करते.

 कधी हा पक्ष लष्कराची खिल्ली उडवतो तर कधी त्यांच्या शौर्यावर शंका घेतो. लष्कराला आधुनिक राफेल मिळू नये यासाठी राहूल गांधी व साऱ्या कॉंग्रेसने साऱ्या प्रकाराने बदनामी मोहीमा चालविल्या. या नकारात्मकतेला देशवासीयांनी मागच्या वर्षी जबरदस्त धडा शिकवला. त्यातूनही राहूल गांधी ाकही सिकले नाहीत. आता पाकिस्तानचा कबुलीनामा तरी त्यांनी ऐकला पाहिजे.

भाजप प्रवक्ते संबीत पात्रा यांनी, पाक खासदाराचे म्हणणे तुम्हाला समजले तरी का ? अशा शब्दांत राहूल गांधींची खिल्ली उडवली. पात्रा यांनी म्हटले की राहूल गांधींनी सादिक याचे ऐकावे. तुम्हीच सर्जिकल स्ट्राईक व एअर स्ट्राईकवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते ना? सादिक काय म्हणतात ते पहा. मोदींची किती भिती-धास्ती शेजारच्या देशात आहे ते ऐका. सादिक यांचे वक्तव्य तुम्हा कळले का ? असा सवाल केला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख