लशींचा अभाव ही गंभीर समस्या, 'उत्सव' नव्हे...राहुल गांधींचा मोदींवर निशाणा - Rahul Gandhi Criticizes PM Modi over vaccine shortage | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

लशींचा अभाव ही गंभीर समस्या, 'उत्सव' नव्हे...राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

'लशीकरण उत्सव साजरा करा' या मोदींच्या विधानावर कॅाग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी टीका केली आहे.

नवी दिल्ली :  महाराष्ट्र , छत्तीसगड, पंजाब, मध्यप्रदेश आणि गुजरात या राज्यांनी कोरोनाची पहिली लाट पार केली आहे. देशभरातील वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोना महामारी सध्यस्थितीची माहिती आणि लसीकरण मोहिमेचाही आढावा घेतला. कोरोनाचा प्रसार वाढत असून येत्या 11 एप्रिल ते 14 एप्रिलदरम्यान लसीकरण उत्सव साजरा करा असे मोदी म्हणाले.

'लशीकरण उत्सव साजरा करा' या मोदींच्या विधानावर कॅाग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी टीका केली आहे. लशीकरणाबाबत गांधी यांनी मोदींना टि्वट करून प्रश्न विचारला आहे.

''आपल्या देशवासीयांना धोक्यात टाकून लसीची निर्यात योग्य आहे का? वाढत्या कोरोना संकटामध्ये लसीचा अभाव ही एक गंभीर समस्या आहे, उत्सव नव्हे,'' असे राहुल गांधी यांनी मोदींना सांगितले आहे. 

 
राहुल गांधी आपल्या टि्वटमध्ये म्हणतात की, वाढत्या कोरोना संकटात लसीचा अभाव ही एक अतिगंभीर समस्या आहे, ‘उत्सव’नाही. आपल्या देशातील नागरिकांना धोक्यात टाकून केंद्र सरकारने लसीची निर्यात करणे योग्य आहे का? केंद्राने सर्व राज्यांना कोणताही भेदभाव न करता मदत करावी. आपल्या सर्वांना एकत्रितपणे या महामारीचा पराभव करावा.

काल मोदी म्हणाले, ''ता. 11 एप्रिलला ज्योतीबा फुले यांची जयंती आहे. तर 14 एप्रिलला डॉ बाबासाहेब आबेंडकर यांची जयंती आहे. यादरम्यान आपण लसीकरण उत्सव साजरा करायला हवा. कोरोनाचा सामना करण्यासाठी आपल्याकडे चांगली संसाधने आहेत. आपल्याकडे लस देखील आहे. आता आपला जोर मायक्रो कंटेन्ट झोन तयार करण्यावर असला पाहिजे. रात्रीच्या कर्फ्यूऐवजी कोरोना कर्फ्यू हा शब्द वापरा म्हणजे सावधता कायम राहील, असे मोदी म्हणाले.  बहुतेक राज्यांमध्ये प्रशासन आळशी दिसत आहे. अशा वेळी कोविडच्या प्रकरणांमध्ये अचानक झालेल्या वाढीमुळे आणखी अडचणी निर्माण झाल्या आहेत, असे मोदी म्हणाले.

यापूर्वी आपण लस नसतानाही कोरोनाचा सामना केला होता आणि जिंकलो होतो. आता आपल्याला चाचणीवर भर द्यावा लागेल. तसेच कोरोना नियमांचे पालन करावे लागेल. तरच आपण या संकटावर मात करू, असा विश्वास मोदींनी काल मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत व्यक्त केला होता. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख