मोदींना चोर म्हटल्याबद्दल राहुल गांधींचा माफी मागण्यास नकार

राहुल गांधी सुरतच्या उच्च न्यायालयात हजर होते
34Sarkarnama_20Banner_20_202021_04_22T164950.481_0 (1).jpg
34Sarkarnama_20Banner_20_202021_04_22T164950.481_0 (1).jpg

सुरत : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी टीका केली होती. याप्रकरणी आज सुरतच्या उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मोदींवर वादग्रस्त टीका केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्यावर खटला दाखल करण्यात आला आहे. rahul gandhi appears before surat court in defamation case over modi surname

याप्रकरणी आज राहुल गांधी सुरतच्या उच्च न्यायालयात हजर होते. त्यांनी न्यायालयात आपलं म्हणणे मांडले.  यावेळी माफी मागण्यास त्यांनी नकार दिला. गांधी म्हणाले, ''मोदी आडनावावर मी टीका केली नाही तर मोदी आडनावावर व्यंग केले होते. याबाबत मला आता काही आठवत नाही. माझा उद्देश कुठल्याही समुदायावर टीका करण्याचा नव्हता. मी निवडणुकीच्या दरम्यान व्यंग करुन टीका करीत होतो. यापेक्षा मला अधिक आठवत नाही.''

माफी मागणार नाही

'याप्रकरणी राहुल गांधी माफी मागणार नाही,'' असे गांधी यांच्या वकीलांनी न्यायालयात सांगितले. याबाबत पुढील सुनावणी ११ जुलैला आहे. मोदींनी बदनामी केल्याप्रकरणी गुजरातमधील भाजपचे आमदार  पूर्णेश मोदी यांनी एप्रिल २०१९ मध्ये राहुल गांधी यांच्या  विरोधात तक्रार दाखल केली होती.  उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ए.एन. दवे यांनी राहुल गांधी यांना आपले म्हणणं मांडण्यासाठी न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला होता. 

काय आहे हे प्रकरण
भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर मोदी आडनावाच्या व्यक्तींची बदनामी केल्याचा आरोप केला आहे.  ''सर्व चोर असलेल्यांचे आडनाव मोदी कसे असू शकते,'' असे राहुल गांधी म्हणाले होते.  कर्नाटक येथील कोलारमध्ये १३ एप्रिल २०१९ रोजी एका निवडणुक रॅलीमध्ये राहुल गांधी म्हणाले होते की नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी या सर्वांचे आडनाव मोदी कसे आहेत. सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे आहे.
 Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com