सलग सहा वेळा खासदार म्हणून निवडून आलेले आर.एल. भाटिया यांचे निधन

आर.एल. भाटिया हे १९७२ पासून सलग सहा वेळा खासदार म्हणून निवडून आले होते.
Sarkarnama Banner - 2021-05-15T151830.865.jpg
Sarkarnama Banner - 2021-05-15T151830.865.jpg

अमृतसर  : कॅाग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यपाल रघुनंदन लाल भाटिया (वय १००) (आर.एल. भाटिया) यांचे आज अमृतसर येथे निधन झाले, त्यांच्या कुटुंबियांनी ही माहिती दिली आहे. त्याच्या मागे मुलगा रमेश भाटिया, मुलगी सरोज मुंजल, लहान भाऊ जे. एल. भाटिया असा परिवार आहे.  आर.एल. भाटिया हे  १९७२ पासून सलग सहा वेळा खासदार म्हणून निवडून आले होते.r l bhatia passes away six times mp from amritsar punjab congres  

आर.एल.भाटिया हे २००४ ते २००८ पर्यंत केरळचे राज्यपाल होते. तर २००८ ते २००९ या कालावधीत ते बिहारचे राज्यपाल होते. काल त्यांना अस्वस्थपणा जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  उपचारा दरम्यान  त्यांचे आज निधन झाले. 

स्वच्छ प्रतिमा असलेले आर. एस. भाटिया हे ३ जुलै रोजी १०१ वर्षांचे होणार होते. गेल्या वर्षी खासदार मनिष तिवारी, खासदार गुरजीत औजला यांच्यासोबत त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर तिवारी यांनी केलेल्या टि्वटमध्ये म्हटलं होते की, आर. एल. भाटिया यांच्या स्मृती, घटनाक्रमांची माहिती कैातुकास्पद आहे.  १९९२ मध्ये त्यांनी  विदेश राज्यमंत्री Minister Of State For External Affairs म्हणून काम पाहिले होते. केंद्र आणि राज्यात त्यांनी विविध पदावर जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. 

हेही वाचा : ठाकरे, मोदी  "एकाच माळेचे मनी.." पेट्रोल-डिझेलचे भाववाढीवरुन मनसेचा टोला 
 
मुंबई : अनेक शहरात पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव सध्या Petrol-Diesel Rate जवळपास सर्वच ठिकाणी शंभरच्या जवळपास आहे.  परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर काय आहेत, यावर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल-डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी मिळवल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.
पेट्रोल डिझेल दरवाढीवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीका केली आहे. आपल्या टि्वटमध्ये नांदगावकर म्हणतात की, मागील 15 महिने सातत्याने दरवाढीचा सामना सामान्य जनता करीत आहे. यात केंद्र व राज्य दोघांनी एक पाऊल पुढे येऊन कर त्वरित घटविले पाहिजे. GST विक्रमी 141000 कोटी वर पोचला असतांना, केंद्राने वेळोवेळी लादलेले कर मागे घ्यावे.
Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com