पुदुच्चेरी : पुदुच्चेरीतील काँग्रेसचे सरकार बहुमताचा आकडा गाठू न शकल्याने कोसळले. पाच आमदारांनी राजीनामा दिल्याने काँग्रेसला बहुमताचा १४ आमदारांचा आकडा पार करता आला नाही. त्यामुळे देशातील काँग्रेसचे आणखी एक सरकार कोसळले आहे. यापूर्वी कर्नाटक व मध्य प्रदेशातील काँग्रेसचे सरकारही अशाचप्रकारे कोसळले होते.
पुदुच्चेरी मधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तमिळनाडू व पुदुच्चरी राज्यांची निवडणूक काही महिन्यांतच होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तमिळनाडूमध्ये काँग्रेस व डीएमके यांनी आघाडी होती. या दोन पक्षांचीच पुदुच्चरीमध्ये सत्ता होती. एकूण ३० विधानसभा सदस्य असलेल्या पुदुच्चरीमध्ये काँग्रेसचे १५ आमदार होते. डीएमकेच्या दोन आमदारांच्या समर्थनानंतर बहुमताचा आकडा पार केला होता.
Puducherry CM V.Narayanasamy loses trust vote in Assembly, government falls pic.twitter.com/iFVE9g7jvf
— ANI (@ANI) February 22, 2021
पण विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधीच काँग्रेसला धक्का बसला आहे. पाच आमदारांनी राजीनामा दिल्याने काँग्रेसचे पुदुच्चेरीमधील सरकार अल्पमतात आले होते. काँग्रेसला आज बहुमत सिध्द करण्याचे आदेश नायब राज्यपालांनी दिले होते. त्यानुसार मुख्यमंत्री नारायमसामी यांच्याकडून सरकारकडे बहुमत असल्याचा दावा केला. पण बहुमतासाठी आवश्यक १४ आमदार ते दाखवू शकले नाहीत. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी काँग्रेसकडे बहुमत नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे विश्वासदर्शक ठराव ते जिंकू शकले नाहीत. परिणामी काँग्रेसचे सरकार कोसळले आहे.
हेही वाचा : लिफ्ट अपघातातून कमलनाथ बचावले
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच पुद्दुचेरीचा दौरा केला होता. या दौऱ्यानंतर काँग्रेसचे सरकार वाचेल अशी चर्चा होती. पण त्यात अपयश आल्याने काँग्रेसला सत्ता राखली आली नाही. काही महिन्यांत विधानसभा निवडणुका असून त्याआधीच सत्ता गमावल्याने काँग्रेसला धक्का बसला आहे.
दरम्यान, आज विधानभेत विश्वासदर्शक ठरावाला काँग्रेसचे सरकार सामोरे जात आहे. या चर्चेदरम्यान बोलताना मुख्यमंत्री नारायणसामी यांनी सभागृहात सरकारच्या कामाचा लेखाजोखा मांडला. ते म्हणाले की, आम्ही डीएमके आणि अपक्षांसोबत मिळून सरकार स्थापन केले. त्यानंतर आम्ही एकत्रितपणे अनेक निवडणुका लढलो. आम्ही या सर्व निवडणुका जिंकलो. त्यामुळे येथील लोकांचा आमच्यावर विश्वास असल्याचे स्पष्ट होते.
केंद्र सरकारसह आधीच्या नायब राज्यपालांनी अनेक अडथळे आणले. आम्ही विनंती करूनही केंद्र सरकारने निधी दिला नाही. तमिळनाडू आणि पुदुच्चेरीमध्ये आम्ही दोन भाषा प्रणिली आणली. पण भाजपने जबरदस्तीने हिंदी लादण्याचा प्रयत्न केला, अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली.
Edited By Rajanand More

