कोट्यवधी डोस दिल्यानंतर कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील निष्कर्ष जाहीर होणार

नीती आयोगाचे सदस्य डॅा. व्ही. के. पॅाल यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
Publication of Covaxin phase 3 trial will be 7 to 8 days says Dr V K paul
Publication of Covaxin phase 3 trial will be 7 to 8 days says Dr V K paul

नवी दिल्ली :  चाचण्यांची अपुरी माहिती असल्याच्या कारणास्तव भारतीय लस (Vaccine) असलेल्या कोव्हॅक्सिनला अमेरिकेत तातडीच्या वापराची परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यावरून आता भारतात चर्चा सुरू झाली आहे. या लशीच्या भारतातील तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्षही जाहीर करण्यात आलेले नाहीत. देशातील कोट्यवधी नागरिकांना ही लस देण्यात आली आहे. त्यावरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Publication of Covaxin phase 3 trial will be 7 to 8 days says Dr V K paul)

नीती आयोगाचे सदस्य डॅा. व्ही. के. पॅाल यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, अमेरिकेतने परवानगी नाकरल्याने आपल्या लसीकरण कार्यक्रमावर त्याचा परिणाम होणार नाही. आपल्याकडे या लशीला परवानगी दिली आहे. लशीच्या सुरक्षेचा आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा डाटा आपल्याकडे आहे. तिसऱ्या टप्प्यातील निष्कर्ष पुढील 7 ते 8 दिवसांत जाहीर केले जातील, असेही पॅाल यांनी स्पष्ट केलं. 

वैज्ञानिकदृष्टीने विचार केला तर प्रत्येक देशातील काही गोष्टी वेगळ्या असू शकतात. विज्ञानमध्ये अधिक प्रगत असलेल्या देशांमध्ये असे होऊ शकते. पण आपली क्षमताही सिध्द झाली आहे. अमेरिकेने हा निर्णय घेतला असेल, तर त्याचा आदर करतो. काही बारकावे असतात, ते काही देशांमध्ये वेगळे असतात, असे पॅाल यांनी स्पष्ट केलं. 

दरम्यान, भारत बायोटेकने कोव्हॅक्सिनचा समावेश इमर्जन्सी यूज लिस्टिंगमध्ये (ईयूएल) करावा, यासाठी डब्लूएचओकडे अर्ज केला आहे. जुलै अथवा सप्टेंबर महिन्यात लशीला मान्यता मिळण्याची अपेक्षा आहे. जगभरातील 60 देशांमध्ये कोव्हॅक्सिनला मान्यता मिळणे प्रलंबित आहे. यात अमेरिका, ब्राझील, हंगेरी आदी देशांचा समावेश आहे. आतापर्यंत 13 देशांमध्ये या लशीला मान्यता मिळाली आहे. आणखी देश मान्यता देण्याच्या मार्गावर आहेत.

अमेरिकेमध्ये ऑक्युजेन या सहकारी कंपनीमार्फत लस उपलब्ध करून दिली जाणार आहे. या कंपनीने अमेरिकेतील अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) कोव्हॅक्सिनला तातडीच्या वापरासाठी परवानगी देण्यासाठी अर्ज केला होता. पण हा अर्ज फेटाळण्यात आला आहे. आता लशीला अमेरिकेमध्ये मान्यतेसाठी संपूर्ण प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. त्यासाठी बायोलॅाजिक लायसन्स अॅप्लीकेशन (BLA) करावे लागेल. 

BLA कडे अर्ज करताना अतिरिक्त माहिती व डाटा देण्यास सांगण्यात आले आहे. यामुळे अमेरिकेत लस उपलब्ध करून देण्यास विलंब होणार असल्याचे मुख्य ऑक्युजेनचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंकर मुसुनिरी यांनी दिली. भारतात कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांची माहिती सहा महिन्यानंतरही प्रसिध्द करण्यात आलेली नाही. त्यामुळं भारतातीही वाद निर्माण झाला आहे. 

डब्लूएचओने फायजर, मॉडर्ना आणि कोव्हिशिल्ड या कोरोना लशींना मान्यता दिली आहे. परंतु, या लशींच्या यादीत कोव्हॅक्सिन नाही. या लशीच्या परिणामकारकतेबाबत आणखी माहिती सादर करावी लागेल, असे डब्लूएचओचे म्हणणे आहे. यावर भारत बायोटेकने म्हटले आहे की, डब्लूएओची मान्यता मिळवण्यासाठी आवश्यक असलेली 80 टक्के कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. उरलेली कागदपत्रे जून महिन्यात सादर केली जातील. लवकरात लवकर आम्हाला ही परवानगी मिळेल, अशी अपेक्षा आहे.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com