कॉंग्रेसचा इतिहास सांगणाऱ्या 'धरोहर' मालिकाचा प्रोमो प्रसिद्ध

देशाच्या 74 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कॉंग्रेसची 1885 पासूनची आतापर्यंतची वाटचाल दर्शविणारा 'धरोहर' या मालिकेचा प्रोमो पक्षाचे महासचिव तथा खासदार राहुल गांधी यांनी आज (ता. 15 ऑगस्ट) प्रसिद्ध केला आहे.
Promo of 'Dharohar' series released by Congress party
Promo of 'Dharohar' series released by Congress party

नवी दिल्ली : देशाच्या 74 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कॉंग्रेसची 1885 पासूनची आतापर्यंतची वाटचाल दर्शविणारा 'धरोहर' या मालिकेचा प्रोमो पक्षाचे महासचिव तथा खासदार राहुल गांधी यांनी आज (ता. 15 ऑगस्ट) प्रसिद्ध केला आहे. 

या "व्हिडिओ'मध्ये पक्षाच्या सर्व नेत्यांसमवेत माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव आणि माजी अध्यक्ष सीताराम केसरी यांचाही समावेश आहे. कॉंग्रेस पक्षाचा 1885 पासूनचा आजपर्यंतचा प्रवास आणि योगदान यातून सांगण्यात आले आहे. या मालिकेत सुमारे 300 लघु व्हिडिओ आहेत. दर आठवड्याला दोन व्हिडिओ प्रदर्शित करण्यात येणार आहेत. 

कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी शनिवारी (ता. 15) जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या, तसेच, कोरोना वॉरियर्सचे कौतुक केले आहे. राहुल गांधींनी माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या एका कथनाचा आधार घेत ट्‌विट करून सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

स्वातंत्र्य दिनी प्रियंका गांधी यांनी सैनिक, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार, शेतकरी आणि मजुरांना नमन केले आहे, त्या म्हणाल्या की, "जिवाची किंमत देऊन, दीर्घ संघर्षानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले. कोट्यवधी भारतीयांनी एकत्र येऊन सत्यासाठी संघर्ष केला आणि ते जिंकले. जिवाची बाजी लावून आपल्याला देशाच्या स्वातंत्र्याचे रक्षण करावे लागेल.' 

दरम्यान, कॉंग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्‍न विचारला आहे की आजचे राज्यकर्ते चीनचे नाव घेण्यास का घाबरत आहेत. सूरजेवाला असेही म्हणाले की, "चीनला भारताच्या भूमीतून पाठीमागे कसे हटवणार,' असा प्रश्‍न आता प्रत्येक देशवासियांनी सरकारला विचारण्याची गरज आहे. 

हेही वाचा : 'मोदीजी, कहॉं गए वो 20 लाख करोड?' युवक कॉंग्रेसचा सवाल 

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचा पर्दाफाश करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसकडून केलेल्या राज्यव्यापी आंदोलनाच्या शेवटच्या दिवशी आज (ता. 14 ऑगस्ट) भाजप कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

या वेळी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी "मोदीजी, कहॉं गये वो 20 लाख करोड?' असा जाब विचारण्यात आला. मुंबईतील कार्यालयासमोर आंदोलनास जात असताना पोलिसांनी अध्यक्ष सत्यजीत तांबे व त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेतले. 

मुंबईतील आंदोलनात युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्याबरोबर उपाध्यक्ष ब्रिजकिशोर दत्त, विधी विभागाच्या समन्वयक करीना झेविअर आणि प्रवक्ते आनंद सिंह हेही सहभागी झाले होते. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com