सरकारी कार्यालयात 'सर’, ‘मॅडम’ म्हणण्‍यास बंदी

अधिकाऱ्यांना नावाने किंवा त्यांच्या पदाने संबोधित करावे, अशी सूचना केली आहे.
Sarkarnama (59).jpg
Sarkarnama (59).jpg

पल्लकड (केरळ) :  केरळमध्ये पलक्कड (Palakkad) जिल्ह्यातील माथुर ग्रामपंचायतीने (Mathur Village Panchayat )एक अनोखा निर्णय घेतला आहे. माथुर ग्रामपंचायतीने त्यांच्या कार्यालय परिसरात ‘सर’ व ‘मॅडम’ या शब्दांचा वापर करण्यावर बंदी घातली आहे. सरकारी कार्यालयात गेल्यावर तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांना ‘सर’ किंवा ‘मॅडम’ असे संबोधन वापरणे बहुतेकांच्या सवयीचे झाले आहे. पण उत्तर केरळमधील  (Kerala)माथुर ग्रामपंचायत त्याला अपवाद ठरली आहे.  

तेथील अधिकाऱ्यांना नावाने किंवा त्यांच्या पदाने संबोधित करावे, अशी सूचना केली आहे. अशा संबोधनांचा वापर थांबविणारी माथुर ग्रामपंचायत ही देशातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. सामान्य नागरिक, लोकप्रतिनिधी आणि सरकारी अधिकारी-कर्मचारी यांच्यातील सीमारेषा पुसून टाकण्यासाठी वसातहकाळातील ‘सर’ आणि ‘मॅडम’ या सन्मानीय संबोधनांवर बंदी घालण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने एकमताने घेतला आहे. माथुरचे अनुकरण अन्य ग्रामपंचायती करणार असल्याची चर्चा आहे. 
 
माथुरचे उपसरपंच पी.आर. प्रसाद म्हणाले की, ग्रामपंचायत कार्यालयात सामान्य व्यक्ती नेहमीच आपल्या कामासाठी येत असतात. त्यांच्यात व प्रशासकीय व्यक्तीमध्ये  औपचारीक संभाषण न कराता त्यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. यामुळे त्यांच्यात मैत्रीची भावना निर्माण होणार आहे. सर आणि मॅडम हे शब्द हे सामान्य व्यक्ती आणि सरकारी व्यक्ती यांच्यात अंतर निर्माण करीत असतात. लोकशाहीत जनता ही खरी मालक असते. प्रशासन त्यांच्या सेवेसाठी असते. त्यामुळे सरकारी व्यक्तींना सन्मान देण्याची गरज नाही. 

 राष्ट्रपतींनी मराठा आरक्षणाचा मुद्दा गांभीर्याने ऐकला आणि म्हणाले...
 नवी दिल्ली : खासदार युवराज संभाजीराजे  छत्रपती (Sambhajiraje) यांच्यासह सर्वपक्षीय शिष्टमंडळाने मराठा आरक्षणप्रश्नी (Maratha Reservation) राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांची राष्ट्रपती भवन येथे भेट घेतली. सुमारे 45 मिनिटे झालेल्या या बैठकीत राष्ट्रपतींनी शिष्टमंडळाचे म्हणणे गांभीर्यपूर्वक ऐकत यावर मी अभ्यास करून निर्णय घेतो, असे आश्वासन दिले. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण, भाजपचे खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि काॅंग्रेसकडून आमदार संग्राम थोपटे यांचा राष्ट्रपतींची भेट घेणाऱ्यांत समावेश होता.  
Edited by : Mangesh Mahale


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com