नोकऱ्यांबाबत त्यांचे मौन का? - Priyanka Gandhi slams PM Modi for talking of implementing CAA in Assam, not providing jobs  | Politics Marathi News - Sarkarnama

नोकऱ्यांबाबत त्यांचे मौन का?

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 21 मार्च 2021

भाजप सरकार आसाममधील नोकऱ्यांबाबत काहीच बोलण्यास तयार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत आसाममध्ये तरुणांकडे नोकऱ्या नसून नोकऱ्यांबाबत मोदी सरकारने मौन का धारण केले आहे, असा सवाल काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी-वड्रा यांनी रविवारी उपस्थित केला. आसाममधील जोरहत येथे प्रचाराच्या रॅलीमध्ये प्रियांका गांधी-वड्रा यांनी हे भाष्य केले. 

आसाम: वादग्रस्त सिटिझनशिप अमेन्डमेंट अॅक्ट (CAA) रद्द करू, असे आश्वासन देऊन आता मात्र यू-टर्न घेत भाजप सत्तेवर आल्यास सीएए लागू करूच, असे विधान करणारे भाजप सरकार आसाममधील नोकऱ्यांबाबत मात्र काहीच बोलण्यास तयार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत आसाममध्ये तरुणांकडे नोकऱ्या नसून नोकऱ्यांबाबत मोदी सरकार मूग मिळून गप्प असून मौन का धारण केले आहे, असा सवाल काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी-वड्रा यांनी रविवारी उपस्थित केला. आसाममधील जोरहत येथे प्रचाराच्या रॅलीमध्ये प्रियांका गांधी-वड्रा यांनी हे भाष्य केले. 

आसाममध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्व राजकीय पक्षांची एकमेकांशी रस्सीखेच सुरू झाली आहे. आसाममध्ये १२६ जागांकरिता मतदान होणार असून २७ मार्चपासून तीन टप्प्यात ते होईल. आसाममध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगणार असून येत्या काही दिवसात कोण बाजी मारणार, हे कळू शकेल. पुढे बोलताना प्रियांका गांधी-वड्रा म्हणाल्या, मागील वेळेसच्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपने बरीच आश्वासने दिली होती. त्यापैकी किती पूर्ण झाली? २५ लाख नोकऱ्या आसाममध्ये उपलब्ध करू, असे आश्वासन पाळले गेलेले नसून भाजपकडून आतापर्यंत केवळ भूलथापाच मारल्या गेल्याचा टोलाही त्यांनी लगावला. 

चहांच्या मळ्यातील कामगारांबाबत बोलताना प्रियांका गांधी-वड्रा म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाममधील चहाच्या मळ्यामधील किती महिलांना समक्ष भेटले? त्यांचे दुःख जाणून घेतले गेले का? उत्तर नाही, असेच मिळत असून चहाच्या मळ्यातील कर्मचाऱ्यांना दररोज ३५० रुपयांचा भत्ता देऊ, हे आश्वासनही केवळ कागदोपत्रीच राहिले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीबाबत बोलताना त्या म्हणाल्या, आसाममध्ये काँग्रेस यंदा विजयी होईल, अशी मला खात्री आहे. आसाममधील नागरिकांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून त्यांच्या राहणीमानात सुधारणा नक्कीच होईल. आसामची संस्कृती, भाषा व ओळख कायमच अबाधित ठेवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न राहील, असेही त्या म्हणाल्या.       

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख