प्रियांका गांधींचे शिक्षणमंत्र्यांना पत्र...परीक्षांबाबत केली मोठी मागणी!

देशात दररोज कोरोनाचे एक लाखांहून अधिक रुग्ण सापडत आहेत.
Priyanka Gandhi demands cancellation cbse examination
Priyanka Gandhi demands cancellation cbse examination

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. अशापरिस्थितीत परीक्षा घेतल्यास परीक्षा केंद्र कोरोनाची हॅाटस्पॅाट बनतील. त्यामुळं केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) परीक्षा रद्द करा, अशी मागणी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वद्रा यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. 

प्रियांका गांधी यांनी आज निशंक यांना पत्र लिहिले आहे. हे पत्र त्यांनी ट्विटही केले आहे. '' देशात दररोज कोरोनाचे एक लाखांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. या स्थितीतही सीबीएसईने मे महिन्यात परीक्षा घेणार असल्याचे म्हटले आहे. हे धक्कादायक आहे. लाखो विद्यार्थी व पालकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट सुरू असताना विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात जाऊन परीक्षा द्यायला लावणे, सुरक्षित नाही,'' असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

विद्यार्थी व पालकांची भीती गैर नाही. लाखो विद्यार्थ्यांची परीक्षा घेताना त्यांना सुरक्षित वातावरण देणे शक्य नाही. परीक्षा घेतल्या, तर विद्यार्थ्यांबरोबर शिक्षक, पर्यवेक्षक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेचाही प्रश्‍न उपस्थित होईल. महामारीच्या काळात विद्यार्थ्यांना परीक्षेला येण्याची सक्ती करणे चुकीचे आहे. असे केल्यास विद्यार्थ्यांना संसर्ग होऊन परीक्षा केंद्रेच कोरोनाचे हॉटस्पॉट बनतील. याला केंद्र सरकार आणि सीबीएसई जबाबदार असेल. त्याची जबाबदारी घ्यायला सीबीएसई तयार आहे का?, असे पत्रात नमुद करण्यात आले आहे. 

विद्यार्थ्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे. राज्या-राज्यात गर्दी टाळण्यासाठी आवाहन केले जात असताना, विद्यार्थ्यांना परीक्षेची सक्ती करणे नैतिकतेला धरून नाही. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना परीक्षेची सक्ती केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. विद्यार्थ्यांना आधीच परीक्षेचा ताण आहे, त्यात त्यांना मास्क घालत अन्य खबरदारी घेऊन परीक्षेची सक्ती केल्यास त्यांची शैक्षणिक कामगिरी खालावेल, अशी भितीही गांधी यांनी व्यक्त केली आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com