नरेंद्र मोदी घेणार दुसऱ्या टप्यात लस...

राज्याला केंद्राकडून 9 लाख 63 हजार डोस उपलब्ध झाले आहेत.
nmcorona21.png
nmcorona21.png

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोरोना लसीकरण मोहीमेला ता. 16 जानेवारी रोजी देशात सुरवात झाली आहे. यावेळी मोदींनी देशवासींयाशी संवाद साधला. लस घेतल्यानंतरही काऴजी घेणे गरजेचे आहे. लस घेतल्यानंतर मास्क लावणे, हात धुणे गरजेचे आहे, असे मोदींनी सांगितले. तीन कोटी लोकांना लस मोफत देणार येणार असल्याचे मोदींनी सांगिततले आहे.  

पहिल्या टप्यात कोरोना योद्धांना लस दिली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसऱ्या टप्प्यात कोरोना लस घेणार असल्याचे वृत्त आहे. केंद्र सरकारने राज्यातील लसीकरण केंद्रांची संख्या कमी केल्याचा आरोप आरोग्यमंत्री राजेश टोपे  केला आहे. राज्याला अपेक्षेपेक्षा कमी डोस मिळाले आहेत. राज्यात लसीकरणाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. केंद्राने महाराष्ट्रातील केंद्राची संख्या कमी करून 350 केली आहे. या केंद्रामध्ये दिवसाला 20 ते 25 हजार जणांना लस दिली जाणार आहे. स्वतःच्या जीवापेक्षा इतरांच्या जीवांची काळजी महत्वाची आहे, मंत्र्यांना नव्हे तर आरोग्य कर्मचाऱ्यांना आधी ही लस देण्यात येणार आहे, असे टोपे यांनी सांगितले आहे. 

केंद्राच्या सुचनेनंतर लसीकरण केंद्राची संख्याही 511 वरुन 350 पर्यंत कमी करण्यात आल्याचं राजेश टोपे म्हणाले आहेत. ''कोरोना लसींचे दोन डोस घ्यायचे आहेत. ते एकाच कंपनीचे डोस असले पाहिजे. यासाठीची काळजी प्रशासन घेत आहे,'' असे टोपे यांनी स्पष्ट केले. राज्याला केंद्राकडून 9 लाख 63 हजार डोस उपलब्ध झाले आहेत.

राज्यातील विविध केंद्रावर कोरोना लस दिली जात आहे. या लस नोंदणीसाठी फसवणूक होऊ शकते, त्यासाठी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना राज्यातील जनतेला खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहे. कुठल्याही भूलथांपाना बळी न पडण्याचे आवाहन देशमुख यांनी जनतेला केले आहे. 

याबाबत अनिल देशमुख यांनी टि्वट करून जनतेला सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. आपल्या टि्वटमध्ये अनिल देशमुख म्हणतात, ''राज्यात कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. ही मोहीम केंद्रीय यंत्रणेकडून जिल्हा यंत्रणेमार्फत राबविली जात आहे. काही सायबर हल्लेखोर नागरिकांना फोन करून या लसीची नोंदणी करण्यासाठी मोबाईलवर आलेला ओटीपी, आधार क्रमांक, पिन कोड व इतर वैयक्तिक माहिती विचारत आहेत.'' 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com