केंद्रस्थानी शेतकरी; आत्मनिर्भर भारताचे बजेट! पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून प्रशंसा - Prime Minister Narendra Modi praises the Union budget | Politics Marathi News - Sarkarnama

केंद्रस्थानी शेतकरी; आत्मनिर्भर भारताचे बजेट! पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून प्रशंसा

वृत्तसंस्था
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

शेतकरी व आत्मनिर्भर भारत मिशन केंद्रस्थानी असलेल्या या अर्थसंकल्पामुळे देशातील प्रत्येक क्षेत्राचा विकास होईल. हा अर्थसंकल्प नव्या भारताचा आत्मविश्वास वाढविणारे असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेत सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाची प्रशंसा केली आहे. शेतकरी व आत्मनिर्भर भारत मिशन केंद्रस्थानी असलेल्या या अर्थसंकल्पामुळे देशातील प्रत्येक क्षेत्राचा विकास होईल. हा अर्थसंकल्प नव्या भारताचा आत्मविश्वास वाढविणारे असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. 

अर्थसंकल्पावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, कोरोना काळामध्ये हा अर्थसंकल्प आत्मनिर्भर भारताचे व्हिजन आहे. देशातील शेतकरी त्याच्या केंद्रस्थानी आहे. शेतकरी हिताच्या अनेक तरतुदी यामध्ये आहेत. त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यावर जोर देण्यात आला आहे. बाजार समित्यांना अधिक सक्षम करण्याची तरतूद आहे. यावरून हा अर्थसंकल्प शेतकरी आणि देशातील गावांचे प्रतिनिधित्व करणारे असल्याचे दिसते. 

नव्या भारताचा आत्मविश्वास वाढविणारा हा अर्थसंकल्प असल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले, देशातील पायाभूत सुविधांमध्ये मोठा बदल होणार आहे. युवकांना अनेक संधी उपलब्ध होतील. असे अर्थसंकल्प खूप कमी पाहायला मिळतात. अनेक आव्हाने असूनही सरकारने अधिक पारदर्शक अर्थसंकल्प सादर करण्यावर सुरूवातीपासून जोर देण्यात आला.

महिलांचे जीवन सुखद बनविण्यासाठी त्यांचे आरोग्य, पोषण आणि त्यांच्यासाठी आवश्यक सुविधांसाठी अनेक बदल करण्यात आले आहेत. नवीन रोजगार निर्मितीसाठी चांगले वातावरण तयार होणार आहे. कोरोना काळातील आत्मनिर्भर भारत मिशनला अधिक वेगाने पुढे नेणारा हा अर्थसंकल्प असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमन, राज्यमंत्री अनुराग ठाकूर व त्यांच्या टीमचे अभिनंदनही केले. 

राहूल गांधी यांच्याकडून टीका

काँग्रेसचे नेते खासदार राहूल गांधी यांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे. ''मोदी सरकार लोकांच्या हातात पैसे ठेवायला विसरले आहे. भारताची संपत्ती भांडवलदार मित्रांच्या हातात देण्याची त्यांची योजना आहे,'' असा आरोप राहूल गांधी यांनी केला आहे.  
 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख