President Ram Nath Kovind has renominated BJP leader Swapan Dasgupta to Rajya Sabha
President Ram Nath Kovind has renominated BJP leader Swapan Dasgupta to Rajya Sabha

विधानसभेसाठी खासदारकी सोडली अन् पराभवानंतर पुन्हा पदरात पडली!

राज्यसभेचा राजीनामा देऊन ही निवडणूक लढवली होती.

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) भाजपच्या विधानसभेच्या उमेदवार यादीत काही खासदारांचाही समावेश होता. त्यापैकी बहुतेकांचा पराभव झाला आहे. स्वपन दासगुप्ता यांनी तर राज्यसभेचा राजीनामा देऊन ही निवडणूक लढवली होती. त्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. पण पुन्हा एकदा त्यांच्या पदरात राज्यसभेची खासदारकी पडली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांची पुन्हा नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड केली आहे. (President Ram Nath Kovind has renominated BJP leader Swapan Dasgupta to Rajya Sabha)

स्वपन दासगुप्ता यांना विधानसभेची निवडणूकीचे तिकीट मिळाल्यानंतर त्यांच्या उमेदवारीवर तृणमूल काँग्रेसने आक्षेप घेतला होता. ते राज्यसभेचे नामनिर्देशित खासदार होते. त्यामुळे कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश करता येत नाही, असा मुद्दा तृणमूलने उपस्थित केला होता. काँग्रेसकडूनही राज्यसभा अध्यक्षांना याबाबत पत्र लिहिले होते. त्यानंतर झालेल्या घडामोडीनंतर दासगुप्ता यांनी १६ एप्रिल रोजी खासदारकीचा राजीनामा दिला होता.  

स्वपन दासगुप्ता यांना भाजपने हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. पण या निवडणूकीत त्यांचा पराभव झाला. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रपतींकडून त्याजागेवर कोणाचीही निवड केली नव्हती. त्यामुळं त्यांची पुन्हा निवड करण्यात आली असून त्यांचा कार्यकाळ २४ एप्रिल २०२२ पर्यंत आहे. 

दरम्यान, तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी ट्विट करून दासगुप्ता यांच्या विधानसभेच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला होता. भारतीय संविधानातील १० व्या अनुसूचीनुसार राज्यसभेच्या नामनिर्देशित खासदारांनी संसदेत शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांनंतर कोणत्याही राजकीय पक्षात गेल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द होते. याबाबतची राज्यघटनेतील तरतूद त्यांनी ट्विटरवर टाकली होती. त्यानंतर या या वादाला तोंड फुटलं होतं. 

दासगुप्ता यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून पुन्हा निवड करण्यात आल्यानंतर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी त्यावर टीका केली आहे. १९५२ नंतर पहिल्यांदाच असे घडल्याचे त्यांनी म्हटलं आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com