कारगिल विजय दिनानिमित्त राष्ट्रपतींकडून लष्करी रुग्णालयाला वीस लाख....

राष्ट्रपतींनी वीस लाख रुपयांचा धनादेश लष्करी रुग्णालयाला दिला असल्याचे यावेळी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. २१ व्या कारगिल विजय दिनानिमित्त त्यांनी आज हुतात्मा जवानांना ट्वीटरद्वारे आदरांजली वाहिली.
President.jpg
President.jpg

नवी दिल्ली  : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कारगिल विजय दिनानिमित्त लष्करी रुग्णालयाला वीस लाख रुपयांची देणगी दिली. कारगिल युद्धात जवानांनी केलेल्या त्यागाला सलाम म्हणून राष्ट्रपतींनी वीस लाख रुपयांचा धनादेश लष्करी रुग्णालयाला दिला असल्याचे यावेळी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.  २१ व्या कारगिल विजय दिनानिमित्त त्यांनी आज हुतात्मा जवानांना ट्वीटरद्वारे आदरांजली वाहिली.

या देणगीतून अत्याधुनिक श्‍वसन यंत्रणा खरेदी केली जाणार आहे. या यंत्रणेमुळे शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना श्‍वासोच्छवासासाठी विषाणूमुक्त शुद्ध हवेचा पुरवठा होतो. कोरोनाग्रस्तांवरील उपचारांदरम्यान या यंत्रणेचा मोठा फायदा होणार असल्याचे राष्ट्रपती भवनातील एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. 

आज या निमित्त भावना व्यक्त करताना राष्ट्रपती म्हणाले की, कारगिल विजय दिवस हा आपल्या संरक्षण दलाच्या निर्भयता आणि अतुलनीय धाडसाचे प्रतीक आहे. यावेळी झालेल्या लढाईत शत्रूशी लढताना सर्वोच्च बलिदान दिलेल्या जवानांना मी अभिवादन करतो. कारगिल युद्धात जवानांनी केलेल्या सर्वोच्च बलिदानासाठी देश या जवानांचा कायम ऋणी राहिल, 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही "मन की बात" मध्ये कारगिल युध्दातील शहीद जवानांना आदरांजली वाहिली. मोदीं यांनी "मन की बात" कार्यक्रमांची सुरवातच कारगिल विजय दिवसाच्या शुभेच्छा देऊन केली. कारगिल युध्दाच्या वेळी मलाही कारगिल येथे जाण्याची संधी मिळाली होती. या जवानांच्या शैार्याचे दर्शन मला मिळाले होते. तो दिवस माझ्या आयुष्यातील महत्वाचा दिवसापैकी एक दिवस आहे. देशातील नागरिक आज या कारगिल विजय दिवसा निमित्त शहीदांना आदरांजली वाहत आहेत. पाकिस्तानी सैनिकांनी कारगिलमध्ये घुसखोरी केल्यानंतर जवळपास तीन महिन्यांची झुंज देत भारतीय जवानांनी २६ जुलै १९९९ ला ‘ऑपरेशन विजय’ यशस्वी केले होते. पाकिस्तानवरील या विजयाची आठवण म्हणून दरवर्षी २६ जुलैला कारगिल विजय दिन साजरा केला जातो.   


हेही वाचा : भाजपच्या खासदार म्हणातात, "हनुमान चालीसा वाचा.. कोराना संपवा"   

नवी दिल्ली : भोपाळ येथील  भारतीय जनता पक्षाच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकुर यांनी कोरानावर रामबाण उपाय शोधला आहे. "हनुमान चालीसा वाचा आणि कोरानाला संपवा" असे प्रज्ञा सिंह ठाकुर यांचे मत आहे. याबाबत त्यांनी एक टि्वट  केले आहे. या टि्वटवर अनेक उलटसुलट प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर उमटत आहे. देशभरातूनन कोरोनाला संपविण्यासाठी ता. ५ आॅगस्ट पर्यंत दररोज सांयकाळी सात वाजता आपल्या घरात हनुमान चालीसाचे पाच वेळा वाचन करावे, असे प्रज्ञा सिंह ठाकुर यांनी सांगितले आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com