President Donald Trump was moved to a safe bunker | Sarkarnama

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षित बंकरमध्ये हलविले...

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 1 जून 2020

न्यूयॉर्क, न्यू जर्सी या शहरासह अमेरिकेतील चाळीस शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 

न्यूयॅार्क  : अमेरिकेत भडकलेला वणवा अद्याप सुरूच आहे. जॅार्ज फ्लाईड या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर अमेरिकेत अनेक आंदोलक हे उत्स्फूर्तपणे रस्त्यांवर उतरले आहेत. रविवारी सुरू झालेल्या या आंदोलनाची धग आता व्हाईट हाऊसपर्यंत पोहचली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षित बंकरमध्ये हलविण्यात आले आहे. वॉशिंगटन, न्यूयॉर्क, न्यू जर्सी या शहरासह अमेरिकेतील चाळीस शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 

अमेरिकेत मिनेपॅालिस येथील जॅार्ज फ्लाईड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा मृत्यू पोलिस ठाण्यात झाला होता. पोलिसांनी जेव्हा या व्यक्तीला पकडले होते तेव्हा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर मिनेपॅालिस शहरात आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. त्यानंतर या आंदोलनाची आस अमेरिकेच्या सर्व राज्यात पसरली आहे. 
 
वॅाशिंटनमध्ये मोठ्या संख्येने आंदोलक व्हाइट हाऊस समोर जमा झाले, त्यांनी घोषणा देण्यास सुरवात केली. त्यांनी पाणी भरलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या पोलिसांच्या अंगावर फेकल्या. पोलिसांनी आंदोलकांना पांगविण्यासाठी अश्रूधुरांचे नळकांडे फोडले. या दरम्यान आंदोलकांनी व्हाईट हाऊससमोर उभ्या असलेल्या एका सरकारी अधिकाऱ्यांच्या गाड्याना आग लावली.  आतापर्यंत 1400 आंदोलकांना पोलिसांनी अटक केली आहे. जॅार्ज फ्लाईड यांच्यावर थर्ड डिगी लावणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. 
 

 

ही बातमी वाचा : देशभरात वर्णद्वेषावरून आंदोलनाचा भडका उडाला 

न्यूयॉर्क : जगात कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग अमेरिकेत झालेला असून, यामुळे बळी पडणाऱ्या नागरिकांची संख्याही अमेरिकेत अधिक आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी अमेरिका सध्या प्रयत्न करीत आहे. नेमक्या याच वेळी देशभरात वर्णद्वेषावरून आंदोलनाचा भडका उडाला असून, यामुळे कोरोनाचा आणखी प्रसार होण्याची भीती अमेरिका सरकारला वाटत आहे. 
कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी संपूर्ण लॉकडाउन करण्यास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कायम विरोध राहिला आहे. यामुळे मध्यंतरी अमेरिकी सरकारने अर्थचक्राला गती देण्यासाठी निर्बंध मागे घेतले होते. यानंतर नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला दिसले होते. आंदोलनावेळी नागरिक सुरक्षित अंतराचा नियम पाळत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये उत्साहाच्या भरात अप्रत्यक्षपणे विषाणूंचा प्रसार करीत असतो याचे भानही नागरिकांनी ठेवणे गरजेचे आहे, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. 
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख