Prashant Kishor has joined CM Amrindar singh as Principal Advisor
Prashant Kishor has joined CM Amrindar singh as Principal Advisor

प्रशांत किशोर यांना बढती; निवडणूक सल्लागारावरून थेट कॅबिनेट मंत्री

विधानसभा निवडणुकीसाठी पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या प्रचाराच्या नियोजनाची जबाबदारी प्रशांत किशोर यांच्यावर आहे.

नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या प्रचाराच्या नियोजनाची जबाबदारी निवडणूक सल्लागार प्रशांत किशोर यांच्यावर आहे. पण निवडणूक होण्याआधीच त्यांना पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी आपले प्रधान सल्लागार हे कॅबिनेट दर्जाचे पद दिले आहे. पंजाबमध्ये 2022 मध्ये होणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रशांत किशोर यांची नियुक्ती करण्यात आल्याची चर्चा आहे.

प्रशांत किशोर यांनी 2017 मध्ये पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचाराच्या नियोजनाची जबाबदारी पेलली आहे. या निवडणुकीत काँग्रेसला बहूमत मिळाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी 2022 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रशांत किशोर यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपविली आहे.

प्रशांत किशोर यांची टीम सध्या पश्चिम बंगालमध्ये तृणमुल काँग्रेस आणि तामिळनाडूमध्ये डीएमकेच्या प्रचाराचे नियोजन करत आहे. यापूर्वी प्रशांत किशोर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यासाठी काम केले आहे. 

मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी ट्विट करून प्रशांत किशोर यांची नियुक्तीची माहिती दिली. पंजाबमधील लोकांच्या हिताची कामे करण्यासाठी आम्ही एकत्र आलो असल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रधान सल्लागार या पदाला कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. 

दरम्यान, प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपला दोन आकडी संख्याही गाठता येणार नाही, असा दावा केला आहे. राज्यातील लोकांना त्यांची मुलगी सत्तेत यावी, असे वाटते. निवडणुकीचे निकाल 2 मेला जाहीर झाल्यानंतर हे ट्विट पाहू शकतात, असे आव्हान त्यांनी ट्विटवरून दिले आहे. भारतात लोकशाहीची महत्वाची लढाई बंगालमध्ये लढली जाईल. बंगालचे लोक आपला संदेश देण्यासाठी सज्ज आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.  

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com