...म्हणून मृत्यूपूर्वीच मोदींनी स्टेडियमला नावं दिलं... - Prakash Ambedkar slams PM Narendra Modi over changing name of Motera stadium | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्र्यांकडून 5 हजार 400 कोटींचे पॅकेज जाहिर...
पुढील 15 दिवस संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार...
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू ठेवणार...
नोंदणीकृत घरगुती कामगारांनाही आर्थिक मदत देणार...
नोंदणीकृत फेरीवाल्यांनाही पंधराशे रुपयांची मदत मिळणार...
परवानाधारक रिक्षाचालकांना पंधराशे रुपये देणार...
पुढील महिनाभर गरीबांसाठी मोफत शिवभोजन थाळी...दोन किलो तांदूळ, तीन किलो गहू मिळणार
राज्यात उद्या रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी...मुख्यमंत्र्यांची घोषणा

...म्हणून मृत्यूपूर्वीच मोदींनी स्टेडियमला नावं दिलं...

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 25 फेब्रुवारी 2021

"देशाला काय नेता मिळाला आहे," असं टि्वट करीत आंबेडकरांनी मोदींची खिल्ली उडविली आहे. 

मुंबई : अहमदाबाद येथील मोटेरा क्रिकेटचे नूतनीकरण करण्यात आले आहे. त्याला आता जगातील सर्वांत मोठे क्रिकेट स्टेडियम बनवण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या स्टेडियमचे उद्घाटन काल झाले. या स्टेडियमचे नाव आधी सरदार पटेल स्टेडियम होते. आता त्याते नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम करण्यात आले आहे. 

मोदींचे नाव स्टेडियमला देण्यावरुन नेटिझन्सनी सोशल मीडियावरून भाजपवर हल्लाबोल केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही मोदी सरकारवर टीका केली आहे. याबाबतचे टि्वट आंबेडकर यांनी केलं आहे. "देशाला काय नेता मिळाला आहे," असं टि्वट करीत आंबेडकरांनी मोदींची खिल्ली उडविली आहे. 

आपल्या टि्वटमध्ये आंबेडकर म्हणतात की देशाला काय नेता मिळाला आहे? जनता विसरुन जाईल अशी त्यांना भीती वाटत आहे. यांच्या मृत्यूनंतर लोक लक्षात ठेवतील की विसरतील याची चिंता आहे. यामुळे त्यांनी मृत्यूपूर्वीच स्टेडियमला नावं दिले आहे. 
 
या स्टेडियमला मोदींचे नाव दिल्यानंतर सोशल मीडियावर युद्ध सुरू झाले आहे. या निर्णयाचे भाजपने स्वागत केले आहे तर नेटिझन्सनी यावर जोरदार टीका केली आहे. अनेक नेटिझन्सनी यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ओढले आहे. सरदार पटेलांनी संघावर बंदी आणली होती, त्याचाच सूड उगवला जातोय, अशी प्रतिक्रिया काहींनी व्यक्त केली आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजीजू , अमित शहांचे पुत्र व भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा हे उपस्थित होते. 

अमित शहा हे सुद्धा आधी गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. नवीन नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वांत मोठे क्रिकेट स्टेडियम बनले आहे. उद्धाटन झाल्यानंतर आज लगेचच स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय सामना सुरू झाला आहे. हा कसोटी सामना भारत आणि ब्रिटन यांच्यात आहे. अहमदाबाद शहरात सरदार वल्लभभाई पटेल क्रीडा संकुलाचे उभारणी करण्याचे नियोजन असून, स्टेडियम हा त्यातील एक भाग आहे.

नामांतरावरुन जितेंद्र आव्हाड यांनी टीकास्त्र सोडलं आहे. स्वातंत्र्य चळवळीतील महान नेते व गुजरातचे सुपुत्र सरदार पटेल यांच्या नावाने मते मागून थकल्यावर त्यांच्या नावे असलेले गुजरात मधील स्टेडियम स्वतःच्या नावावर करून घेतलेहिटलर सत्तेत आल्यानंतर त्याने देखील मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वतःचे नाव दिले होते, असं ट्वीट करत मोदींवर निशाणा साधला आहे.

नावे बदलण्याच्या धुंदीत भारतरत्न मिळालेल्या महापुरुषांचा अवमान भाजपकडून करण्यात येतोय, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टेडियमचे नाव बदलून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले आहे. यावर नवाब मलिक यांनी भाजपावर जोरदार प्रहार केला आहे.

प्रियांका चतुर्वेदी यांनी ट्विट करून नामांतरावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामध्ये त्यांनी आधी मोटेरा स्टेडियमच्या बदललेल्या स्वरूपाचे कौतुकही केले. पण या स्टेडिअमला असलेले सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव काढल्याबद्दलही त्यांनी खंत व्यक्त केली आहे.  

Edited  by :  Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख