राहुल गांधी म्हणतात, "शेतकऱ्यांना अडविण्यापेक्षा...चिनी सैनिकांना रोखा..."

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.
nmrg25.jpg
nmrg25.jpg

नवी दिल्ली : चिनी सैनिकांनी भारतीय सैन्यावर हल्ला केला आहे, तर दुसरीकडे देशभरातील शेतकरी दिल्लीत कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करीत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी याबाबत टि्वट केलं आहे. 

"केंद्र सरकारचं काम शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमांवर अडवणे हे नसून चीनला देशाच्या सीमांवर रोखणे हे होते." अशा शब्दांमध्ये राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. त्यांनी केंद्र सरकारला अहंकारी आणि अयोग्य असे म्हटलं आहे. 
 

कृषी कायद्यांवर तोडग्यासाठी शुक्रवारी दुपारी चर्चेची बारावी फेरी झाली. केंद्र सरकारने यापुर्वीच तिन्ही कायद्यांना स्थगिती देण्याचा निर्णय जाहीर केला होता. तसा प्रस्ताव शेतकरी संघटनांसमोर ठेवला होता. पण संघटनांनी हा प्रस्तावही फेटाळून लावला. या संघटना कायदे रद्द करण्याच्या भुमिकेवर ठाम आहेत. यापार्श्वभूमीवर शुक्रवारी बैठकीला सुरूवात झाली. कृषीमंत्र्यांनी कायद्यांना स्थगितीचाच प्रस्ताव मांडला. पण शेतकरी नेत्यांना आपली भुमिका कायम ठेवल्याने पुढे चर्चा झाली नाही. काही मिनिटांतच बैठक आटोपती घेण्यात आली. 

'तिन्ही कृषी कायदे योग्य आहेत. सरकारच्या प्रस्तावावर जरूर विचार करा व चर्चा करून निर्णय कळवा. तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद. चर्चेची पुढची तारीख निश्‍चित नाही' असे सांगून कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर व अन्य दोन्ही मंत्री दुपारी एकच्या सुमारास शेतकऱ्यांसमोर हात जोडून बैठकीच्या दालनातून निघून गेले. दुपारी चारच्या आसपास मंत्री पुन्हा बैठकीच्या दालनात आले व नंतरच्या काही मिनिटांतच बैठकच संपली.

आंदोलन शांततेत चालविल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानले. यापुढील आंदोलनही शांततेत राहील व काही विपरीत घटना-दुर्घटना होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी तुमची आहे. आंदोलन संपू नये व ते
चिघळत जावे यासाठी काही शक्ती प्रयत्नशील आहेत, असे तोमर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
 
दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी  तीन दिवसापासून मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाविकास आघाडीचे नेते आजच्या आंदोलनात सहभागी झाले आहे. केंद्र सरकारने केलेल्या कृषीविषयक कायद्याच्या निषेधार्थ नाशिकहून निघालेला हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईतील आझाद मैदानात धडकला आहे. अखिल भारतीय किसानसभेच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चाद्वारे कृषी कायद्याविरोधात दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा दिला जाणार आहे. प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानंतर मागण्यांचे निवेदन राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांना देण्यात येणार आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com