41 आमदार भाजपच्या संपर्कात : या नेत्याचा दावा

ममता बॅनर्जी यांच्यावर नाराज असलेल्या ४१ आमदारांनी भाजपामध्ये सामील होण्याची तयारी दर्शविली आहे, अशी माहिती कैलास विजयवर्गीय यांनीदिली आहे.
Mamata Banerjee15 - Copy.jpg
Mamata Banerjee15 - Copy.jpg

कोलकत्ता : यंदाच्या निवडणुकीत भाजपाने तृणमूलसमोर कडवे आव्हान उभे केले आहे. तृणमूलच्या अनेक बड्या नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. तृणमूलचे दिग्गज नेते शुभेंदु अधिकारी यांनी राजीनामा दिल्यावर ममता बॅनर्जींच्या गोटात भूकंप झाला होता. त्यानंतर आता तृणमूलचे ४१ आमदार भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत. तृणमूलमधील अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी स्वत:हून राजीनामे देण्यास सुरूवात केली आहे. तृणमूलकडून त्यांना मिळालेली पदे ते सोडत आहेत.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर नाराज असलेल्या ४१ आमदारांनी भाजपामध्ये सामील होण्याची तयारी दर्शविली आहे, अशी माहिती भाजपाचे राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

विजयवर्गीय म्हणाले, '' भाजपाने ठरविले तर हे आमदार लगेच पक्षात येतील. त्यामुळे ममता बॅनर्जी यांचे सरकारही पडेल. परंतु, आम्ही या आमदारांना लगेच पक्षात घेणार नाही. चांगली प्रतिमा असणाऱ्यांनाच भाजपात प्रवेश दिला जाईल. एखाद्यावर काही आरोप असतील, त्याची प्रतिमा खराब असेल तर त्यांना पक्षात प्रवेश दिला जाणार नाही. तृणमूल कॉंग्रेसच्या ४१ आमदारांची यादी आहे. त्यांनी भाजपामध्ये सामील होण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, कोणाला पक्षामध्ये घ्यायचे हे भाजपा अद्याप ठरवित आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा सातत्याने पश्चिम बंगालचे दौरे करत आहेत. भाजपाने सात वरिष्ठ नेत्यांवर बंगालमधील विविध भागांची जबाबदारी सोपविली आहे. 
पश्चिम बंगालमध्ये किमान २०० जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपाने ठेवले आहे. सध्या तृणमूल कॉंग्रेसकडे २२२ आमदार आहेत.    

हेही वाचा : मायावती यांची मोठी घोषणा..

नवी दिल्ली : बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आज मोठी घोषणा केली आहे. उत्तराखंड आणि उत्तरप्रदेशात येत्या विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पार्टी कुठल्याही पक्षाशी युती करणार नसल्याची महत्वाची घोषणा मायावती यांनी आज केली आहे. येथील सर्व जागा लढविणार असल्याचे मायावती यांनी आज सांगितले. मायावती यांचा आज वाढदिवस आहे. उत्तरप्रदेशात जर आमची सत्ता आली तर सर्वांना मोफत कोरोना लस देण्यात येईल, असे आश्वासन मायावती यांनी दिले आहे.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com