भाजप खासदाराच्या कथित सेक्स व्हिडीओने राजकीय भूकंप 

आपचे नेते माधाभाई पटेल यांनी या व्हिडिओसंदर्भात आपल्या फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती.
भाजप खासदाराच्या कथित सेक्स व्हिडीओने राजकीय भूकंप 
Political quake over alleged sex video of BJP MP .jpg

अहमदाबाद : भाजप (BJP) खासदाराच्या कथित सेक्स व्हिडीओने गुजरातच्या (Gujarat) राजकारणात भूकंप आला आहे. या व्हिडिओचा एक फोटो दाखवून आम आदमी पक्षाच्या नेत्याने दावा केला की तो १५ ऑगस्टला संपूर्ण व्हिडिओ समोर आणणार आहे. पण त्याआधीच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती भाजपचे खासदार परबत पटेल  (Parbat Patel) असल्याचा दावा करण्यात येत आहे. पटेल यांनी हा व्हिडीओ कोणाचे तरी षड्यंत्र असल्याचे सांगितले आहे, त्यांच्या मुलाने याबाबत पोलिसात तक्रार दिली आहे. (Political quake over alleged sex video of BJP MP) 

आपचे नेते माधाभाई पटेल यांनी या व्हिडिओसंदर्भात आपल्या फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये चेहरा दिसत नव्हता. मात्र, माधाभाईंनी लिहिले होते की ''ते या भाजप नेत्याचा संपूर्ण व्हिडिओ १५ ऑगस्टला फेसबुक पेजवर पोस्ट करतील.

ही पोस्ट व्हायरल होताच भाजप नेते आणि खासदार परबत पटेल यांनी माध्यमांसमोर आपली बाजू मांडली. व्हायरल व्हिडिओबद्दल आपल्याला जास्त माहिती नसल्याचे पटेल यांनी सांगितले होते. त्यांनी असा दावा केला होता की आक्षेपार्ह आणि अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेलिंग आणि बदनामी करण्याच्या हेतूने कोणत्यातरी व्हिडिओशी छेडछाड करून तयार केला. पटेल यांनी मुलीची ओळख करण्यासही नकार दिला होता. यापूर्वीही मला ब्लॅकमेल आणि बदनाम करण्याचे प्रयत्न झाले असल्याचे त्यांनी सांगितले होते. ''मी कधीही कोणतेही वाईट काम केले नाही. माझा फोटो एडिट करून तेथे लावला गेला असल्याची शक्यता, असल्याचे पटेल यांनी सांगितले होते. 

मात्र, मघाभाई यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये खासदार परबत पटेल पालनपूरच्या शासकीय अतिथीगृहात अश्लिल चाळे करताना पकडले गेले असल्याचे म्हटले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी पटेल यांच्या मुलाने माधभाई आणि मुकेश राजपूत या दोघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पटेल यांचे पुत्र शैलेश यांनी सांगितले की, माझ्या वडीलांची बदनामी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिस या प्रकरणाचा तपास करत, असत्याचे त्यांनी म्हटेल आहे. 

याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने पटेल यांचा कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या तरुणाला अटक केली. पटेल यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली. खासदार एका तरुणीसोबत आक्षेपार्ह स्थितीत बसलेले व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहेत. बनासकांठाचे पोलिस उपअधीक्षक पी एस चौधरी म्हणाले की, बनसकांठाचे भाजप खासदार यांचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याबाबत खासदारांकडून तक्रार प्राप्त झाली होती. त्या प्रकरणी पोलिसांनी अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या एकाला अटक केली आहे.  

Related Stories

No stories found.