तीरथ सिंह रावत उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री...  - politic tirath singh rawat new bjp chief minister of uttarakhand | Politics Marathi News - Sarkarnama

तीरथ सिंह रावत उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री... 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 10 मार्च 2021

तीरथ सिंह रावत हे उत्तरांखडचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

नवी दिल्ली : उत्तराखंडचे मुख्यमंत्री कोण होणार? या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे, पैाडी गढवालचे खासदार तीरथ सिंह रावत हे उत्तरांखडचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. आज देहराडून येथे भाजपच्या कार्यालयात आमदारांच्या बैठकीत तीरथ सिंह रावत यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. 

सध्याचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी बैठकीनंतर मुख्यमंत्रीपदासाठी तीरथ सिंह रावत यांच्या नावाची घोषणा केली. आज दुपारी चार वाजता तीरथ सिंह रावत हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या इतर नावांत अजय भट्ट, सतपाल महाराज, धनसिंह रावत, अनिल बलुनी, रमेश पोखरीयाल निशंक यांचा समावेश होता. यातील धनसिंह रावत, निशंक यांची नावे आघाडीवर होती.  पण तीरथ सिंह रावत यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे आल्याने अनेकांना धक्का बसला आहे. 

सोमवारी त्रिवेंद्र सिंह रावत यांनी राज्यपालांची भेट घेऊन राजीनामा दिला होता. आज सकाळी साडेदहा वाजता झालेल्या बैठकीत तीरथ सिंह रावत यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. बैठकीत त्यांची सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली. या बैठकीला भाजपचे सर्व आमदार उपस्थित होते. छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री रमन सिंह आणि भाजपचे प्रदेश प्रभारी दुष्यंत कुमार गौतम पर्यवेक्षक म्हणून उपस्थित होते. 

पत्रकारांशी बोलताना तीरथ सिंह रावत म्हणाले की, माझ्यावर पक्षाने जी जबाबदारी सोपवली आहे, तीचे मी पूर्णपणे पालन करणार आहे. त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या विकासाच्या कामाला गती देईल. त्रिवेंद्र सिंह रावत यांनी उल्लेखनीय काम केले आहे. असं काम यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी केलं नव्हतं. मी राज्याच्या विकासासाठी काम करणार आहे.  

हेही वाचा : सरकारची आज अग्निपरीक्षा...अविश्वासाचा प्रस्ताव आणणार...
 
चंडीगढ़: हरियाणा येथील मनोहर लाल खट्टर सरकारसाठी आज महत्वाचा दिवस आहे. सरकारची आज अग्निपरीक्षा आहे. कृषी कायद्याच्या विरोधात काँग्रेस आज खट्टर सरकारच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव आणणार आहे. काँग्रेस पक्षाकडून याबाबतची पूर्ण तयारी केली आहे. विरोधपक्षनेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे. कोण आमदार कुणाच्या सोबत आहेत, हे आज विधानसभेत आज निश्चित होईल.कृषी कायद्याच्या विरोधात हरियाणा येथे विधानसभेबरोबरच रस्त्यावरही सरकारच्या विरोधात आंदोलन होणार आहे. हरियाणामध्ये कृषी कायद्याच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहेत. काँग्रेसने कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन अधिक तीव्र केलं आहे. या आंदोलनाला रोखण्यासाठी भाजपनं आमदारांसाठी व्हिप काढला आहे. त्यामुळे भाजपचे सर्व आमदार आज सभागृहात उपस्थित राहणार आहेत.
Edited  by :  Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख