विधानभवना बाहेरच पोलिसाची आत्महत्या; चिठ्ठीत लिहिले, मुख्यमंत्री...!

अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधानभवनाबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Policeman posted in secretariat shot himself in lucknow
Policeman posted in secretariat shot himself in lucknow

लखनऊ : विधानभवनाबाहेर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिस उपनिरीक्षकाने स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे. त्यांच्याजवळ मुख्यमंत्र्यांच्या नावाने एक चिठ्ठी सापडली आहे. त्यात आपल्या कुटूंबाची काळजी घ्यावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे. 

सध्या उत्तर प्रदेश विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय सुरू आहे. या अधिवेशनासाठी विधानभवनाबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक निर्मल चौबे विधानभवनच्या गेट क्रमांक सातवर तैनात होते. गुरूवारी दुपारी त्यांनी स्वत:च्या पिस्तुलातून गोळी झाडून घेतली. यावेळी जवळच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे धाव घेतली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

चौबे यांच्याजवळ एक चिठ्ठी सापडली आहे. ही चिठ्ठी चौबे यांनी मुख्यंत्री योगी आदित्यनाथ यांना उद्देशून लिहिली आहे. ''माझी तब्येत ठीक नसते. तुम्ही माझ्या कुटूंबाची काळजी घ्या. मी हे जग सोडून जात आहे,'' असे चिठ्ठीत लिहिले आहे. चौबे यांच्या आत्महत्तेनंतर पोलिस दलात खळबळ उडाली आहे. 

चौबे हे मुळचे वाराणसीमधील पलही पट्टी येथे राहणारे आहेत. त्यांच्या घरी आई विद्या देवी, तीन लहान भाऊ प्रदीप कुमार, अतुल कमार व अनिल कुमार, पत्नी निरूपमा, विकास व सर्वेश ही दोन मुले, विकासची पत्नी अर्चना असा परिवार आहे. मागील काही दिवसांपासून ते सतत आजारी होते. त्यामुळे त्यांच्यावर मानसिक ताण होते. यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. 

चौबे हे 1987 मध्ये पोलिस दलात शिपाई म्हणून रुजू झाले होते. त्यांना पदोन्नती मिळत ते पोलिस निरीक्षकापर्यंत पोहचले. चौबे यांच्या आजाराविषयी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना माहित होते. त्यामुळे त्यांना घराजवळ असलेल्या विधानभवनाजवळच ड्युटी दिली जात होती. पण सतत येथील ड्युटी दिल्यानेही ते नाराज होते. त्यावरून वरिष्ठांशी वाद झाल्याचेही काहींचे म्हणणे आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com