पोलिसांच्या गणवेशात भाजप कार्यकर्ते !

पोलिसांच्या गणवेशात भाजप कार्यकर्ते सध्या वावरत असल्याचा गंभीर आरोप बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी केला. पोलिसांचा गणवेश विकत घेऊन भाजपचे कार्यकर्ते नागरिकांना पोलिस असल्याचं भासवत असून त्यांना धाक दाखवत घाबरविण्यात येत आहे.
mamata banerjee
mamata banerjee

पश्चिम बंगाल: विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून पहिल्या टप्प्यातील मतदान शनिवारी (ता. 27) झाले. एकूण 294 जागांसाठी मतदान होणार असून 8 टप्प्यात ते होईल व निकाल 2 मे रोजी लागेल. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे. पोलिसांच्या गणवेशात भाजप कार्यकर्ते सध्या वावरत असल्याचा गंभीर आरोप बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी केला. पोलिसांचा गणवेश विकत घेऊन भाजपचे कार्यकर्ते नागरिकांना पोलिस असल्याचं भासवत असून त्यांना धाक दाखवत घाबरविण्यात येत आहे. तसेच भाजपला मतदान करण्याबाबतही तंबी भरण्यात येत असल्याचा आरोप ममता यांनी केला. 

ममता बॅनर्जी म्हणाल्या, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने पोलिसांचा गणवेश विकत घेऊन तो भाजपच्या कार्यकर्त्यांना दिल्याची पक्की माहिती माझ्याकडे आहे. पोलिसांच्या वेशभूषेतील कार्यकर्ते रस्तो-रस्ती फिरताना दिसत असून गावकऱ्यांना धमकावले जात आहे. भाजप बंगालमध्ये हिंदू-मुस्लिम यांच्यात भांडणे लावण्यासाठीच आली आहे. दरम्यान, येत्या गुरूवारी (ता. 1) नंदिग्राममध्ये दुसऱ्या टप्प्यातील हाय व्होल्टेज लढत होत असून त्यामुळे भाजप व तृणमूल काँग्रेसकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. 

ममता बॅनर्जी विरुद्ध भाजपचे सुवेंदू अधिकारी अशी लढत नंदिग्राममध्ये होणार आहे. अधिकारी यांनी गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यामध्येच भाजपमध्ये प्रवेश केला असून यापूर्वी ते तृणमूलमध्ये होते. दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्यावर 50 हजारांच्या फरकाने जिंकीन, असा दावा भाजपचे नंदिग्राममधील उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी केला आहे. तर मीच खूप मोठ्या फरकाने जिंकून भाजपचा सुपडा साफ करेन, असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. येत्या 1 एप्रिल रोजी सुवेंदू अधिकारी विरुद्ध ममता बॅनर्जी अशी चुरशीची लढाई होणार असून कोण बाजी मारेल याकरिता 2 मे ची वाट पाहावी लागेल.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com