PNB SCAM : मेहुल चोकसीला डोमिनिका सरकारकडून झटका... - pnb scam mehul choksi illegal immigrant government of dominica | Politics Marathi News - Sarkarnama

PNB SCAM : मेहुल चोकसीला डोमिनिका सरकारकडून झटका...

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 10 जून 2021

अवैध प्रवासी म्हणून घोषित केल्याने त्याचे भारतात प्रत्यार्पण होणे शक्य असल्याचे समजते.

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बॅक गैरव्यवहारातील आरोपी मेहुल चोकसी याला डोमिनिका सरकारने मोठा झटका दिला आहे. त्याला अवैध प्रवासी म्हणून घोषित केले आहे. एटिगुआ येथे राहणारा मेहुल चोकशी हा २३ मे रोजी डोमिनिका येथे पोहचला होता. तेव्हा डोमिनिका पोलिसांनी त्याला अटक केली होती. सध्या तो डोमिनिकाच्या कारागृहात आहे.pnb scam mehul choksi illegal immigrant government of dominica

मेहुल चोकशीच्या याचिकेवर सध्या डोमिनिकाच्या न्यायालयात सुनावणी सुरु आहे. त्यावर अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. डोमिनिका प्रशासनाने त्यांची याचिका रद्द करण्यासाठी न्यायालयात दस्ताऐवज दाखल केले आहे. त्याला भारतात पाठवावे, असे डोमिनिका प्रशासनाने न्यायालयात सांगितले. डोमिनिका सरकारने त्याला अवैध प्रवाशी म्हणून घोषित केल्याने त्याचे भारतात प्रत्यार्पण होणे शक्य असल्याचे समजते. एटिगुआचे पंतप्रधान गैस्टन ब्राऊन यांनी सांगितले की, मेहुल चोकसीलाआमच्याकडे पुन्हा न पाठविता त्याला भारताकडे सोपवा. 

२०१७ मध्ये मेहुल चोकसीने एटिगुआ आणि बारबुडा येथील नागरिकत्व घेतले आहे. जानेवारी २०१८ पासून मेहुल भारतातून फरार असल्याचे सरकारने घोषित केलं आहे. या प्रकरणातील दुसरा आरोपी नीरव मोदी सध्या ब्रिटनमध्ये असून त्याच्या प्रत्यार्पणाबाबत याचिका दाखल करण्यात आली आहे.  मेहुल चोकसी प्रत्यार्पण प्रकरणात त्याच्या गर्लफ्रेंडबाबतही चर्चा काही दिवसापासून रंगली आहे. यात बारबरा जबरिका हि त्यांची गर्ल फ्रेंड असल्याचे वृत्त काही दिवसापूर्वी आले होते. आता बारबरा जबरिका हीने त्यांच्या नातेसंबधाबाबत स्वतः खुलासा केला आहे. एनआयए या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.  

"मी अनेक वेळा याबाबत स्पष्ट सांगितले आहे की मी त्याची गर्लफ्रेंड नाही. आमची भेट झाली तेव्हा त्याने मला त्याचे नाव 'राज' असल्याचे सांगितले होते.  माझ्या जवळ स्वतःचा उद्योग - व्यवसाय आहे. मला त्याच्या पैशांची, मदतीची, हॅाटेल बुकिंग, दागिन्यांची गरज नाही," असे बारबरा हीने स्पष्ट केले आहे. मेहुल चोकसी अपहरण प्रकरण खोटे असल्याचेही तिने सांगितले. त्याने मला हिऱ्याचे दागिने दिले होते. ते बनावट होते, असेही तिने सांगितले.

"मेहुल चोकसीच्या गैरव्यवहाराची मला माहिती नाही, मला भारतातील भष्ट्राचारी लोकांबाबतही माहिती नाही. गेल्या आठ दिवसांमध्ये प्रसारमाध्यमांतून मला ही माहिती मिळाली. त्याने मला क्युबा येथे भेटणार असल्याचे सांगितले होते. त्याचा क्युबा येथे जाण्याचा बेत होता. त्यांना डोमिनिका येथ जायचे नव्हते.  एटिंगुआ येथील नागरिकांनाही मेहुल चोकसीच्या पार्श्वभूमीबाबत माहित नाही," असे बारबरा हिने एनआयएला सांगितले.  
Edited by : Mangesh Mahale 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख