मोदी आपल्या कवितेत म्हणतात, 'अभी तो सूरज उगा है'.. - pm narendra modi writes a poem abhi toh suraj uga hai | Politics Marathi News - Sarkarnama

मोदी आपल्या कवितेत म्हणतात, 'अभी तो सूरज उगा है'..

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 1 जानेवारी 2021

मोदींनी या कवितेला आपला आवाज दिला आहे. ही कविता सोशल मीडियावरून व्हायरल  होत आहे.   

नवी दिल्ली : कोरोनाशी संघर्ष करत आपण नवीन वर्षाचे स्वागत करीत आहोत. या नवीन वर्षात कोरोनाचे संकट जरी असले तरी त्यांचा सामना आम्ही करू, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज एक कविता लिहिली आहे. 

नरेंद्र मोदी यांनी 'अभी तो सूरज उगा है' असा विश्वास व्यक्त करून कवितेच्या माध्यमातून संकटाचा सामना करून आपलं जीवन प्रकाशमान करण्याचं आव्हान केलं आहे. त्यांची ही कविता  @MyGovIndia  या ट्विटर हैंडलवरून शेअर करण्यात आली आहे. या कवितेला मोदींनी आपला आवाज दिला आहे. ही कविता सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे.   

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील नववर्षानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी देशातील जनतेच्या सुख, समुद्धी आणि उत्तम आरोग्यसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. नरेंद्र मोदींनी याबाबत टि्वट केलं आहे. भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसच्या अध्यक्षा प्रियंका गांधी आदींनी नवीन वर्षानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी टि्वट करून शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणतात की नवीन वर्षाची सुरवात ही नवीन सुरवात असते. व्यक्तीगत आणि सामुहीकपणे केलेल्या संकल्पांना बळ देण्याचा हा दिवस असतो. कोरोनाच्या संकटात सर्वांनी आव्हानांना सामोरे जाऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करावा. माझी प्रार्थना आहे की आपण सर्व जण सुखी, आरोग्यसंपन्न राहा. देशाच्या विकासाला हातभार लावावा. 

मुख्यमंत्र्यांनी लिहिले राज्यातील जनतेला खुले पत्र
मुंबई : महाराष्ट्रातील जनतेने यंदाच्या वर्षी करोनाला पूर्णपणे हद्दपार करण्याचा आणि आपल्या वैयक्तिक आरोग्याबरोबरच इतरांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा संकल्प नवीन वर्षात करुयात, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या जनतेला उद्देशून लिहिलेल्या खुल्या पत्रात केले आहे. मुख्यमंत्र्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून ठाकरे यांनी हे पत्र लिहिले आहे.नवीन वर्ष आरोग्यदायी होण्यासाठी स्वयंशिस्तीचा निर्धार करा, असे आवाहन करुन ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जनतेला उद्देशून लिहिलेल्या पत्रात मुख्यमंत्र्यांनी गेल्या वर्षभरात लढलेला कोरोना लढ्याचा थोडक्यात आढावा घेतला असून नवीन वर्षात परिस्थिती कशी असेल याचाही थोडक्यात आढावा घेतला आहे.

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख