शशिकलांचा धसका अन् पंतप्रधानांचे एमजीआर, जयललितांना नमन...

तुरूंगवास भोगून चार वर्षांनंतर तमिळनाडूत परतलेल्या व्ही. के. शशिकला यांच्यामुळं सत्ताधारी अण्णा द्रमुक पक्षामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
PM Narendra Modi pays tribute to MGR and Jayalalithaa in tamilnadu
PM Narendra Modi pays tribute to MGR and Jayalalithaa in tamilnadu

चेन्नई : तुरूंगवास भोगून चार वर्षांनंतर तमिळनाडूत परतलेल्या व्ही. के. शशिकला यांच्यामुळं सत्ताधारी अण्णा द्रमुक पक्षामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीत राजकीय समीकरणं मोठ्या प्रमाणावर बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शशिकला यांच्याविषयी पक्षातील कोणीही उघडपणे बोलत नाही. माजी मुख्यमंत्री एमजीआर आणि जयललिता यांना समोर ठेवूनच तमिळनाडूतील राजकीय चक्र फिरू लागली आहेत. 

आज तमिळनाडूच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर एमजीआर आणि जयललिता यांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या. पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री एडापड्डी पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम यांनी या प्रतिमांना पुष्पवार अर्पण करून श्रध्दांजली वाहिली. याच कार्यक्रमादरम्यान या तिनही नेत्यांनी एकमेकांचे हात हातात घेत उंचावून उपस्थितींना अभिवादन केले.

एमजीआर आणि जयललिता यांच्याभोवतीच राजकारण फिरत आहे. शशिकला या जयललिता यांच्या निकटवर्ती सहकारी होत्या. जयललिता यांच्या निधनानंतर शशिकला यांच्याकडेच पक्षाची जबाबदारी येणार होती. पण त्यांना बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात शिक्षा झाल्याने तुरूंगात जावे लागले. त्यामुळे मुख्यमंत्री एडापड्डी पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम यांच्यासाठी आधी शशिकला गॉडफादर ठरल्या होत्या. राज्याच्या राजकारणात त्या दोघांना पुढे आणण्याचे श्रेय शशिकलांना जाते. पण त्यांना तुरूंगवास झाल्यानंतर पक्षातून निलंबित करण्यात आले. 

आता शशिकलांच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेषत: अण्णाद्रमुक पक्षात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. शशिकलांच्या सुटकेमुळे राज्यात बदलणाऱ्या राजकीय समीकरणांचा धसका पक्षाने घेतला आहे. शशिकला यांच्याकडून एमजीआर, जयललिता यांच्या नावांचा वापर करून मतदारांना साद घातली जाऊ शकते. त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या गटांनी एकत्र येऊन शशिकलांच्या विरोधात रणनीती आखण्यास सुरवात केली आहे. आज तमिळनाडूमध्ये पंतप्रधानांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमामध्येही याची प्रचिती आली. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणामध्ये तमिळनाडूच्या संस्कृतीसह शेतकऱ्यांचेही तोंडभरून कौतुक केले. तसेच तमिळनाडूसाठी केंद्र सरकारने दिलेल्या निधी व विविध प्रकल्पांची माहितीही त्यांनी दिली. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com