पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आज चार तासात तीन मॅरेथॉन बैठका  - PM Narendra Modi high level Meetings Today on Corona | Politics Marathi News - Sarkarnama

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आज चार तासात तीन मॅरेथॉन बैठका 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

कोरोना परिस्थितीचा आढावा, मृत्यूदर, ऑक्सिजनचा पुरवठा याची मोदी माहिती घेणार आहेत.

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाला रोखण्यासाठी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मॅरेथॉन बैठका आयोजित केल्या आहेत. चार तासात तीन बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील कोरोना परिस्थितीचा आढावा, मृत्यूदर, ऑक्सिजनचा पुरवठा याची मोदी माहिती घेणार आहेत. त्यानंतर काय उपाययोजना कराव्यात, याबाबत चर्चा होणार आहे. 

पंतप्रधान मोदींनी बंगालमध्ये प्रचारासाठी जाणार नसल्याचे काल जाहीर केले होते.  मी देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठक घेत आहे. यामुळे मी पश्चिम बंगालला जाऊ शकणार नाही, असे टि्वट मोदींनी काल केले होते.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालचा दौरा रद्द केल्यानंतर या बैठका आयोजित केल्या आहेत.  
पश्चिम बंगालमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. 

बंगालमध्ये आठ टप्प्यात विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीत सत्ताधारी तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप असे चित्र आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निवडणूक एकाच टप्प्यात घ्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली होती. परंतु, भाजपने निवडणुकीमुळे कोरोना पसरत नाही, असे सांगत पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार निवडणूक घ्यावी, अशी मागणी निवडणूक आयोगासमोर घेतली होती.  

कोरोनाग्रस्त पुजाऱ्यासाठी असुदुद्दीन ओवैसी पुढे सरसावले...AIMIMच्या रूग्णालयात दाखल

देशातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असताना अनेक उच्च न्यायालये आणि आज खुद्द सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने कोरोनाविषयक उपाययोजनांचा आराखडा सादर करण्याचे निर्देशही केंद्र सरकारला दिले आहेत. गेल्या काही दिवसापासून नरेंद्र मोदी राज्यातील प्रमुख, डॅाक्टर, औषध कंपन्याचे प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करीत आहेत.

हेही वाचा : नरेंद्र मोदींकडून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख 
मुंबई :  विरार येथे एका रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रूपये. तर जखमींना ५० हजार रूपयांची आर्थिक मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे. टि्वट करुन ही माहिती देत मोदींनी मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. भाजपचे नेते राजनाथ सिंह यांनी टि्वट करून संवेदना वक्त केल्या आहेत. विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागातील एससीचा स्फोट झाला. यातील पाच जणांना दुसऱ्या रूग्णालयात हलविण्यात आले आहे. मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यात तेरा रूग्णांचा होरपळून मृत्यू झाला. यात पाच महिला तर आठ पुरुषांचा समावेश आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेच्या चैाकशीचे आदेश दिले आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख