18 वर्षांवरील सर्वांनाच केंद्रातर्फे मोफत लस  : मोदींची मोठी घोषणा

राज्यांच्या मागणीनुसार ता. 1 मे पासून राज्यांकडे लसीकरणाचे 25 टक्के काम देण्यात आले होते.
PM Narendra Modi declares free covid vaccination to all above 18
PM Narendra Modi declares free covid vaccination to all above 18

नवी दिल्ली : राज्यांकडे देण्यात आलेली लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकारने काढून घेण्यात आली आहे. आता ता. 21 जूनपासून केंद्र सरकारकडूनच राज्यांना लस दिली जाणार आहे. तसेच 18 वर्षांपुढील प्रत्येकाला केंद्राकडूनच मोफत लस दिली जाणार असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली आहे. (PM Narendra Modi declares free covid vaccination to all above 18)

पंतप्रधान मोदी यांनी आज देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. राज्यांच्या मागणीनुसार ता. 1 मे पासून राज्यांकडे लसीकरणाचे 25 टक्के काम देण्यात आले होते. पण यामध्ये अनेक अडचणी येऊ लागल्याने अनेक राज्यांनी हे काम पुन्हा केंद्र सरकारनेच करावे, अशी मागणी होऊ लागली. राज्यांना यातील प्रक्रियेतील अडचणी, जगभरातील लशींची उपलब्धता याची जाणीव झाली. त्यामुळे केंद्र सरकारने देशातील 18 वर्षांपुढील प्रत्येकाची लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकारने घेण्याचा निर्णय घेतल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. 

मोदी म्हणाले, पुढील दोन आठवड्यांनी हा निर्णय लागू केला जाईल. केंद्र व राज्य सरकार मिळून नवीन नियमावली तयार केली जाईल. लसीकरण कार्यक्रमाचे आवश्यक नियोजन केले जाईल. दोन आठवड्यानंतर 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. या दिवसापासून 18 वर्षांपासून पुढे सर्वांसाठी मोफत लस दिली जाईल. देशात उत्पादित होणाऱ्या एकुण लशींचा 75 टक्के वाटा भारत सरकार घेऊन राज्यांना मोफत देईल. कोणताही खर्च राज्यांना करावा लागणार नाही. आतापर्यंत देशातील कोट्यवधी लोकांना मोफत लस मिळाली आहे. आता 18 वर्षापुढील नागरिकांनाही मोफत लस मिळेल. 

जे व्यक्ती मोफत लस घेऊ इच्छित नाहीत, खासगी रुग्णालयात जाऊन सल घेऊ इच्छितात, त्यांच्याही व्यवस्था करण्यात आली आहे. खासगी रुग्णालयांना थेट लस उत्पादक कंपन्यांकडून  लस घेता येईल. त्यासाठी 25 टक्के लशी कंपन्यांकडून उपलब्ध करून दिल्या जातील. खासगी रुग्णालये थेट या लशी घेऊ शकतात. त्याचप्रमाणे लसीकरणाच्या निर्धारीत किंमतीपेक्षा 150 रुपये सेवाशुल्क घेऊ शकतील. त्यापेक्षा जास्त शुल्क घेता येणार नाही. याची देखरेख करण्याचे काम राज्यांकडे असेल, असे पंतप्रधानांनी सांगितले.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com