जगानं पाहिलं! पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्र्यांना झापलं...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॅान्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.
PM Narendra Modi criticise CM arvind kejriwal over live telecast
PM Narendra Modi criticise CM arvind kejriwal over live telecast

नवी दिल्ली : देशातमध्ये कोरोना रुग्णांमध्ये दररोज विक्रमी वाढ होत असल्याने गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं रुग्णांना बेड, अॅाक्सीजन, औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. प्रामुख्याने देशातील दहा राज्यांमध्ये रुग्णवाढीचा वेग अधिक आहे. यापार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॅान्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. 

बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह राजस्थान, कर्नाटक, छत्तीसगड आदी राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. राज्यातील परिस्थितीची माहिती देत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे विविध मागण्याही मांडल्या. केजरीवाल यांनीही पंतप्रधान मोदींकडे अनेक मागण्या केल्या. पण हा संवाद माध्यमांवर लाईव्ह दाखविला जात होता. 

काही वेळाने ही बाब पंतप्रधान मोदींच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी केजरीवाल यांना मध्येच थांबविले. त्यानंतर मोदी केजरीवालांना म्हणाले की, ''एखाद्या मुख्यमंत्र्यांनी इनहाऊस मीटिंगचे लाईव्ह प्रेक्षपण करणे हे आपली पंरपरा व प्रोटोकॅालच्या अतिशय विरोधात होत आहे. हे योग्य नाही. याचे आपण नेहमी पालन करायला हवे.'' एवढे बोलल्यानंतर पंतप्रधान मोदी शांत झाले. पण याचेही लाईव्ह प्रक्षेपण सुरू होते. 

दरम्यान, केजरीवाल यांनी या बैठकीत पंतप्रधानांचे विविध मुद्यांकडे लक्ष वेधले. दिल्लीमध्ये अॅाक्सीजन उत्पादक कंपनी नाही. मग दिल्लीतील दोन कोटी जनतेला अॅाक्सीजन मिळणार नाही का? ज्या राज्यांमध्ये या कंपन्या आहेत, ती राज्य अॅाक्सीजन देणार नाहीत का? एखादे राज्य दिल्लीच्या कोट्याचा अॅाक्सीजन थांबवत असेल तर मी केंद्रात फोनवर कुणाशी बोलू. पंतप्रधानांनी योग्य वेळेत बैठक घेतली आहे. दिल्लीकरांच्या वतीने मी हात जोडून विनंती करतो की, जर कडक पावले उचलली नाहीत, तर भयानक परिस्थिती निर्माण होईल, असे केजरीवाल म्हणाले.  

दिल्लीत येणार अॅाक्सीजन टँकर थांबविले जात आहेत. पंतप्रधान जी, कृपया तुमच्या मुख्यमंत्र्यांना फोन करा. जेणेकरून टँकर दिल्लीत पोहचतील. लोकांना खूप त्रास होत आहे. आता स्थिती पाहवत नाही. मी दिल्लीचा मुख्यमंत्री असूनही राज्यासाठी काही करू शकत नाही. देशातील सर्व अॅाक्सीजन प्लँट केंद्राने ताब्यात घ्यावेत. कोणतीही राज्य टँकर थांबविणार नाहीत, यासाठी लष्कराची मदत घ्यावी, अशी मागणीही केजरीवाल यांनी केली.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com