नरेंद्र मोदींची लोकप्रियता घसरली... - pm modi is approval rating at 66 ahead of us president biden germany merke | Politics Marathi News - Sarkarnama

नरेंद्र मोदींची लोकप्रियता घसरली...

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 18 जून 2021

कलम ३७० व अन्य विषयांवरील कामगिरीमुळे मोदी हे आघाडीवर होते. 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता घसरली असल्याचे एका पाहणीत आढळले आहे. अमेरिकेच्या डेटा इंटेलीजन्स फर्म मॉर्निंग कन्सल्टतर्फे केल्या गेलेल्या सर्व्हेक्षणात ही माहिती समोर आली आहे. जगभरातील नेत्यांचे अॅप्रूव्हल रेटिंग ट्रॅक डेटा इंटेलीजन्स फर्म मॉर्निंग कन्सल्ट ही रिसर्च कंपनी करीत असते. pm modi is approval rating at 66 ahead of us president biden germany merke     

गेल्या वर्षींच्या तुलनेत मोदींची लोकप्रियता घसरली असल्याचे दिसून आले आहे. या वर्षींच्या पाहणीत नरेंद्र मोदी यांचे यांचे ग्लोबल अॅप्रूव्हल रेटिंग ६६ टक्के आहे.यापूर्वी (२०१९) च्या पाहणीत मोदींचे रेटिंग ८२ टक्के होते. गेल्यावेळेच्या तुलनेत मोदींची लोकप्रियतेत घसरण झाली असली तरी मोदी जगातील अन्य देशांच्या नेत्यांपेक्षा लोकप्रियतेत आघाडीवर आहेत. नरेंद्र मोदी हे तेरा देशांच्या नेत्यांमध्ये आघाडी आहे.  

गेल्या वेळी कलम ३७० व अन्य विषयांवरील कामगिरीमुळे मोदी हे आघाडीवर होते. त्याचे रेटिंग ८२ टक्के होते, तर आता हे रेटिंग ६६ टक्के आहे. ही टक्केवारी अमेरिका, रशिया, युके, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, फ्रांस, ब्राझील, जर्मनीसह १३ देशातील नेत्यांपेक्षा जास्त आहे. 

अशी आहे अन्य नेत्यांची क्रमवारी..
या यादीत इटलीचे पंतप्रधान मारियो ड्रॅगी दोन नंबरवर (६५ टक्के), मेक्सिकोचे राष्ट्रपती लोप्से ओब्रेडोर तीन नंबरवर (६३ टक्के), ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरीसन चार नंबरवर (५४ टक्के), जर्मनी चान्सलर अन्जेला मर्केल ५३ टक्के रेटिंग सह पाच नंबरवर आहेत.  सहा नंबरवर अमेरिकेचे जो बायडेन, कॅनडाचे जस्टीन टुडो ४८ टक्के रेटिंगसह सात नंबरवर आहेत. तर युकेचे बोरीस जॉन्सन ४४ टक्के रेटिंग सह आठ नंबरवर, दक्षिण कोरियाचे मून जे इन ३७ टक्के रेटिंग सह ९ नंबरवर तर स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सांचेझ १० व्या नंबरवर आहेत.
 
रामदेव बाबा पुन्हा अडचणीत..खोटी माहिती दिल्याच्या आरोपावरुन गुन्हा दाखल..
रायपूर : योगगुरू रामदेव बाबा  यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कोरोनावर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अॅलोपॅथी औषधांवर त्यांनी टीका केली होती. याप्रकरणी आता रायपूर येथे (छत्तीसगड) रामदेवबाबा यांच्यावर गुन्हा करण्यात आला आहे. छत्तीसगडच्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या शाखेने याबाबतची तक्रार दिली होती. या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामदेव बाबा यांच्यावर भादंवि कलम १८८, कलम २६९ आणि कलम ५०४ अनुसार आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख