३१ आॅक्टोबरला 'राष्ट्रीय एकता दिवस' पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा - PM Mode Addresses Nation Through Maan KI Baat | Politics Marathi News - Sarkarnama

३१ आॅक्टोबरला 'राष्ट्रीय एकता दिवस' पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा

सरकारनामा ब्युरो
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

सरदार वल्लभ भाई पटेल यांची जयंती (३१ आॅक्टोबर) राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या कार्यक्रमातून आज केली. या कार्यक्रमाला आज सहा वर्षे पूर्ण झाली. ३१ आॅक्टोबर ही दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी. त्यांनाही मोदी यांनी आदरांजली अर्पण केली.

नवी दिल्ली : सरदार वल्लभ भाई पटेल यांची जयंती (३१ आॅक्टोबर) राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या कार्यक्रमातून आज केली. या कार्यक्रमाला आज सहा वर्षे पूर्ण झाली. ३१ आॅक्टोबर ही दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी. त्यांनाही मोदी यांनी आदरांजली अर्पण केली.

आपल्या 'मन की बात' या कार्यक्रमातून पंतप्रधान मोदी यांनी विविध विषयांवर देशवासियांशी संवाद साधला. देशातील जनतेला विजयादशमीच्या व दुर्गापुजेच्या शुभेच्छा देताना मोदी म्हणाले, "संकटावर संयमाने मान करण्याचा हा दिवस आहे. आज तुम्ही आम्ही सर्वजण खूप अवघड परिस्थितीतून जात आहोत. अत्यंत संयमाने सणवार साजरे करत आहोत. दुसरीकडे कोरोनाशी लढाही देत आहोत. या लढ्यात विजय निश्चित आहे,'' सणवारासाठी खरेदी करताना 'व्होकल फाॅर लोकल' हा मंत्र लक्षात ठेवण्याचे आवाहनही मोदी यांनी केले. 

पंतप्रधानांनी मल्लखांब या देशी खेळाचाही उल्लेख आपल्या भाषणात केला. अमेरिकेत चिन्मन आणि प्रज्ञा पाटणकर यांनी सुरु केलेल्या मल्लखांब केंद्राचाही पंतप्रधानांनी आवर्जून उल्लेख केला. त्यांच्यामुळे अमेरिकेत अनेक ठिकाणी मल्लखांब प्रशिक्षण सुरु झाल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले. देशभरात खादी ही फॅशन स्टेटमेंट बनत असताना जगभरातही खादीचे उत्पादन सुरु झाल्याचे मोदी यांनी सांगितले. मेक्सिकोची ओकाहा खादी लोकप्रिय होत असल्याचाही उल्लेख त्यांनी केला. 

देशभरात उत्सव साजरे केले जात असताना कोरोनाच्या साथीत अविरत काम करणारे सफाई कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांच्या कार्याचे भान ठेवण्याचे व उत्सवाच्या काळात त्यांना बरोबर घेऊन पुढे जाण्याचे आवाहन मोदी यांनी यावेळी केले. देश सण साजरे करत असताना सीमेवर लढणाऱ्या जवानांना व त्यांच्या कुटुंबियांना मोदी यांनी वंदन केले. या वीरांच्या स्मरणार्थ प्रत्येकाने आपल्या घरात एक दिवा लावावा, असेही आवाहन त्यांनी केले.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख