गोयल म्हणतात, "राहुल गांधींना काहीही कळत नाही, हे सांगण्याची हिमंत कोणामध्ये नाही.."  - Piyush Goyal says Rahul Gandhi doesn't know anything no one has the courage to say that | Politics Marathi News - Sarkarnama

गोयल म्हणतात, "राहुल गांधींना काहीही कळत नाही, हे सांगण्याची हिमंत कोणामध्ये नाही.." 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020

राहुल गांधींना काहीही कळत नाही, हे सांगण्याची राहुल गांधी यांच्या जवळ राहण्याऱ्यापैकी कुणाचीही हिमंत नाही," अशी टीका पिय़ुष गोयल यांनी केली आहे.

नवी दिल्ली : "राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कल्पनेची खिल्ली उडवत असले तरी जगातील प्रमुख कंपनीचे मुख्याधिकारी पंतप्रधान मोदींच्या सूचनेला पाठिंबा देतात. राहुल गांधींना काहीही कळत नाही, हे सांगण्याची राहुल गांधी यांच्या जवळ राहण्याऱ्यापैकी कुणाचीही हिमंत नाही," अशी टीका केंद्रीय रेल्वेमंत्री पिय़ुष गोयल यांनी केली आहे. याबाबत पियुष गोयल यांनी टि्वट केलं आहे. 

काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डेन्मार्कमधील एका अधिकाऱ्याशी व्हिडिओ कॅान्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली होती. पवन उर्जेच्या टर्बाईनचा वापर जलशुद्धीकरणासाठी करावा, असे व्यक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं होतं. या वक्तव्यावरून कॉंग्रेस-भाजपच्या नेत्यांची जुंपली आहे. 

मोदींच्या वक्तव्याची कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी जोरदार खिल्ली उडवली. मोदींना कळत नाही हे सांगण्याची त्यांच्या जवळच्यांपैकी कोणाचीही हिंमत नाही, अशी कोपरखळी लगावल्यामुळे कॉंग्रेस आणि भाजपमध्ये जुंपली आहे. मोदींच्या संभाषणाचा व्हिडिओ राहुल गांधी यांनी टि्वटवरून शेअर करीत मोदींची खिल्ली उडवली होती. मोंदीना समजत नाही, हे सांगण्याची हिमंत मोदीजवळील व्यक्तीमध्ये नाही, असं व्यक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं. 

यावरून भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत. रेल्वेमंत्री पिय़ुष गोयल यांनी राहुल गांधी यांच्या त्या व्यक्तव्याचा समाचार घेऊन त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी यावरून राहुल गांधींवर जोरदार टीका करताना, विज्ञानाचा अभ्यास करा असा खोचक सल्लाही दिला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पवन उर्जा क्षेत्रातील कंपनीच्या मुख्याधिकाऱ्यांशी साधलेल्या संवादादरम्यान, पवन उर्जेवर चालणाऱ्या टर्बाईनचा उपयोग करून स्वच्छ पेयजल, प्राणवायू आणि उर्जा निर्माण केली जाऊ शकते, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याची खिल्ली उडविणारे ट्विट राहुल गांधींनी केले. पंतप्रधानांचे अज्ञान हा भारतासाठी खरा धोका नाही. प्रत्यक्षात, त्यांच्या जवळ असणाऱ्यांपैकी कोणामध्येही त्यांना सत्य सांगण्याची हिंमत नाही, असा उपहास राहुल गांधींनी उडवला. अशा प्रकारचे टर्बाईन हवेतून पाणी तयार करत असल्याची बातमीही राहुल यांना टॅग केली. राहुल गांधींच्या या ट्विटनंतर भाजप नेतेही संतापल्याचे दिसून आले. 

रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी राहुल गांधीना उद्देशून खोचक ट्विट केले. भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी यासंबंधीचे दोन शोधनिबंध पाठवून ते वाचण्याची सूचना राहुल गांधींना ट्विटद्वारे केली. सोबतच, या विषयाची क्लिष्टता पाहता तुम्हाला ते समजणार नाही, अशी कोपरखळीही लगावली. भाजपच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालविय यांनीही राहुल गांधीवर टीका करणारे ट्विट केले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख