तुम्हाला नव्हे केंद्रालाच लस देणार! फायजर आणि मॉडर्नाचा राज्यांना नकार

कोरोना (Covid-19) प्रतिबंधात्मक लशींचा देशात मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे.
Pfizer and Moderna refused to sell vaccines directly to states
Pfizer and Moderna refused to sell vaccines directly to states

नवी दिल्ली : कोरोना (Covid-19) प्रतिबंधात्मक लशींचा देशात मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे अनेक लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागत आहेत. अनेक राज्यांनी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण (Vaccine Shortage) थांबवले आहे. त्यामुळे बहुतेक राज्यांनी लशींसाठी ग्लोबल टेंडर काढले आहे. पण फायजर व मॅाडर्ना या लशींच्या उत्पादक कंपन्यांनी थेट राज्यांना लस देण्यास नकार दिला आहे. केवळ केंद्र सरकारलाच लशींचा पुरवठा केला जाईल, असे या कंपन्यांनी स्पष्ट केलं आहे. (Pfizer and Moderna refused to sell vaccines directly to states)

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. या कंपन्यांनी केवळ केंद्र सरकारशी विक्री व्यवहार करण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे केंद्र सरकारने लस आयात करुन सर्व राज्यांना पुरवावी, अशी मागणी केजरीवाल यांनी केली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही यापूर्वी मॅाडर्ना कंपनीने लस देण्यास नकार दिल्याचा दावा केला होता. आता केजरीवाल यांनीही ही माहिती दिल्याने देशातील राज्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. 

केजरीवाल म्हणाले, आम्ही मॅाडर्ना व फायजर कंप्यांशी लशीबाबत बोललो. त्यावर दोन्ही कंपनीने थेट आम्हाला लस देण्यास नकार दिला आहे. केवळ केंद्र सरकारशीच लशीबाबत करार केला जाईल, असे कंपनीने स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे मी केंद्र सरकारला लशींची आयात करून राज्यांना वितरित करण्याचे आवाहन करतो. आपला खूप वेळ वाया गेला आहे. आता आम्ही कसल्या परिस्थती लस हवी आहे, असे केजरीवाल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

पंजाबच्या लसीकरण कार्यक्रमाचे नोडल अधिकारी विकास गर्ग यांनीही रविवारी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले, मॅाडर्ना या कंपनीने पंजाब सरकारला लस देण्यास नकार दिला आहे. कंपनीच्या धोरणानुसार ते केवळ केंद्र सरकारशीच करार करतील. राज्य सरकार किंवा कोणत्याही खासगी संस्थांनी करार केला जाणार नाही.  

देशात लशींचे उत्पादन करू शकतात अशा १६ कंपन्या आहेत. त्यापैकी दोन कंपन्यांशी भारत बायोटेकने करार केला आहे. केंद्र सरकारने या १६ कंपन्यांची बैठक घेऊन त्यांना कोव्हॅक्सिन (Covaxin) लशीची निर्मिती करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केजरीवाल यांनी केली आहे. दरम्यान, देशात भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि सिरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड (Covishield) या लशींचा वापर होत आहे. आतापर्यंत जवळपास १९ कोटी डोस देण्यात आले आहेत. काही दिवसांपासून स्पुटनिक व्ही ही लसही भारतात देण्यास सुरूवात झाली आहे. पण त्याची प्रमाण अत्यल्प असल्याने केवळ हैद्राबादमध्येच उपलब्ध आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com