खनिज तेल घसरले तरी पेट्रोलच्या दरात केवळ १८ पैशांचीच कपात

सलग २४ दिवसांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नव्हता.
Petrol diesel prices slashed first time this year
Petrol diesel prices slashed first time this year

नवी दिल्ली : सलग २४ दिवसांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नव्हता. यावर्षात सातत्याने इंधन दरवाढ होत होती. अखेर आज इंधनाचे दर काही प्रमाणात कमी झाले आहेत. या वर्षात पहिल्यांदाच इंधनाचे दर कमी झाले असून  पुढील काही दिवसांतही हे दर कमी होऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

मागील महिन्यांत सलग 12 दिवसांत पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ३.६३ रुपये आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर ३.८४ रुपये वाढ झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे भाव घसरत असूनही दरात कपात होत नसल्याने सामान्यांच्या खिशाला बसणारी झळ बसत होती.

मात्र, बुधवारी खनिज तेलाचे भाव कमी झाल्याने पेट्रोलच्या दरात १८ पैसे तर डिझेलच्या दरात १७ पैशांनी कपात करण्यात आली. हा कपात किरकोळ असल्याने ग्राहकांना पुरेसा दिलासा मिळणार नाही. भविष्यात खनिज तेलाचे भाव आणखी कमी होत गेल्यास कंपन्यांकडून दर आणखी कमी केले तरच ग्राहकांच्या खिशावरील बोजा कमी होणार आहे. 

देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर सार्वकालिक उच्चांकी पातळीवर आहेत. देशातील चार प्रमुख महानगरांमध्ये मुंबईत पेट्रोल आणि डिझेल सर्वाधिक महागडे आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २७ फेब्रुवारी रोजी वाढ झाली होती. त्यानंतर सलग १९ दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतेही बदल झालेले नाहीत. आता आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे भाव घसरु लागले आहेत. यामुळे तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होणे अपेक्षित होते. मागील आठ दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या भावात सहा टक्के घट होऊन तेलाचा भाव प्रतिबॅरल ६१ डॉलरवर आला आहे. 

देशातील चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंधनाच्या दरात सलग २४ दिवसांपासून कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. कारण खनिज तेलाचे भाव वाढलेले असताना तेल कंपन्यांनी आधी दरवाढ केलेली नव्हती. त्यामुळे आता त्यांच्याकडून दरकपात होण्याची शक्यता नाही. तेल कंपन्या आधी झालेला तोटा भरुन काढण्यावर भर देतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

गेल्या वर्षी एप्रिल/मे महिन्यात खनिज तेलाच्या भावाने आंतरराष्ट्रीय पातळीवर दोन दशकांतील नीचांकी पातळी गाठली होती. त्यावेळी मोदी सरकारने महसूल वाढवण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवरील कर वाढवला होता. या भाववाढीचा बोजा ग्राहकांवर पडत आहे. मात्र, सरकारने वाढवलेले कर कमी केलेले नाहीत. 

प्रमुख महानगरांतील आजचे पेट्रोल, डिझेलचे दर 
दिल्ली : पेट्रोल - ९०.९९, डिझेल - ९१.१७ 
मुंबई : पेट्रोल - ९७.४०, डिझेल ८८.४२ 
चेन्नई : पेट्रोल - ९२.९५, डिझेल ८६.२९
कोलकता : पेट्रोल ९१.१८, डिझेल ८४.१८ 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com