जनकल्याणामुळेच इंधन दरवाढ; पेट्रोलियम मंत्र्यांचा दावा  

एका वर्षात कोरोना प्रतिबंधक लसीकरणावर ३५ हजार कोटींहून अधिक खर्च झाला आहे.
  Petrol-Diesel, Dharmendra Pradhan ).jpg
Petrol-Diesel, Dharmendra Pradhan ).jpg

नवी दिल्ली : देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) भाववाढीमुळे नागरिक संकटात सापडले आहेत. आधीच कोरोना महामारीमुळे हैराण झालेल्या नागरिकांचे या दरवाढीमुळे हाल होत आहेत. अशातच आता केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी भाववाढीबद्दल खुलासा केला आहे. (Petrol-diesel price hike due to public welfare scheme; Petroleum Minister Dharmendra Pradhan) 

प्रधान म्हणाले की ''जनकल्याणाच्या योजनांमुळे इंधनाचे भाव वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे भाव वाढल्याने तसेच केंद्रीय आणि राज्यांच्या करांमुळे इंधनाचे दर वाढले आहेत. मात्र, आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी दरवाढीचे नवे कारण सांगितले आहे.

धर्मेंद्र प्रधान म्हणाले, मला मान्य आहे की, इंधन दरवाढीमुळे जनसामान्यांचे हाल होत आहेत. पण एका वर्षात कोरोना प्रतिबंधक लसीकरणावर ३५ हजार कोटींहून अधिक खर्च झाला आहे. गरीबांना आठ महिन्यांचा किराणा मोफत देण्यासाठीच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेवर एक लाख कोटी रुपये खर्च झाले आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम पाठवण्यात आली. तसेच शेतकऱ्यांसाठी तांदूळ आणि गव्हाच्या MSP ची घोषणा करण्यात आली. 

त्याशिवाय देशात रोजगारासाठी आणि विकासकामांसाठी पैशांची गरज आहे. अशावेळी आम्ही पैसे वाचवून ते पैसे लोककल्याणासाठी वापरत असल्याचे प्रधान यांनी सांगितले. काँग्रेस खासदार राहुल गांधींनी इंधन दरवाढीवर केलेल्या टीकेबद्दल प्रधान यांना विचारले असता, ते म्हणाले, जर राहुल गांधींना (Rahul Gandhi) गरीबांची एवढीच काळजी वाटते, तर त्यांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना आपल्या राज्यातल्या इंधनांचे दर कमी करण्यास सांगितले पाहिजे. गेल्या दीड महिन्यात तेल कंपन्यांनी २५ वेळा इंधनाचे दर वाढवले आहेत.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com