केरळमधील लोक शिक्षित असल्यानेच मत देत नाहीत; भाजप नेत्याचा घरचा आहेर

देशातील ५ राज्यातील निवडणुकांच्या प्रचारात चांगलीच रंगत आली आहे.
  Amit Shah, Narendra Modi .jpg
Amit Shah, Narendra Modi .jpg

नवी दिल्ली : देशातील ५ राज्यातील निवडणुकांच्या प्रचारात चांगलीच रंगत आली आहे.  केरळमध्ये ६ एप्रिलपासून पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होत आहे. केरळमधून यंदा भारतीय जनता पक्षाला मोठी आशा आहे. पण, येथील जेष्ठ भाजप नेत्यानेच पक्षाला झटका दिला आहे. 

केरमधील भाजप नेते ओ राजगोपाल यांनी एका मुलाखतीत केरळमध्ये भाजपला अधिक मते न मिळण्याचे कारण सांगितले. केरळ इतर प्रदेशापेक्षा वेगळा आहे, येथील लोक उच्चशिक्षित असल्याने भाजपला मत देत नाहीत, असे ते म्हणाले.  

हरयाणा आणि त्रिपुरा येथे पक्षाने आगेकूच केलीय, तर पश्चिम बंगालमध्येही कमी वेळेत भाजपने रणनिती बनवली. मग, केरळमध्ये भाजप सक्षम का ठरत नाही? असा प्रश्न रोजगोपाल यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना, राजगोपाल म्हणाले, केरळमध्ये भाजपला मोठे समर्थन न मिळण्यास दोन-तीन कारण आहेत. केरळचा साक्षरता दर ९० टक्के आहे. येथील लोक विचार करतात, तर्क लावतात. शिक्षित लोकांची ही सवयच आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे केरळमध्ये ५५ टक्के हिंदू आहेत आणि ४५ टक्के अल्पसंख्यांक आहेत. प्रत्येक कॅल्क्युलेशनमध्ये ही बाबही येते. त्यातच केरळची तुलना इतर कुठल्याही राज्यासोबत केली जाऊ शकत नाही. येथील परिस्थिती वेगळीच आहे. पण, आम्ही चांगले काम करण्याचा प्रयत्न करतोय, असे ओ राजगोपाल यांनी आपल्या मुलाखतीत म्हटले.

राजगोपाल यांच्या वक्तव्यावरुन काँग्रेस नेत्यांनी लगेच भाजपला लक्ष्य केले. शशी थरुर यांनी म्हटले की, माझे मित्र, माजी प्रतिस्पर्धी आणि भाजप नेते राजगोपाल यांनी हे मान्य केलेय की केरळमधील लोक भाजपला मत देत नाहीत. कारण ते शिक्षित असून ते वैचारीक भूमिका घेतात. काँग्रेसनेही अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन ट्विट करत, राजगोपाल यांचे विधान शेअर केले, तसेच फक्त केरळच नाही, संपूर्ण देशच आता भाजपला मतदान करणार नाही, असेही म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com