चीनची लस घेतल्यानंतर पंतप्रधानांना कोरोनाची लागण.. - Pakistan Prime Minister Imran Khan Covid 19 positive Sinopharm Vaccine | Politics Marathi News - Sarkarnama

चीनची लस घेतल्यानंतर पंतप्रधानांना कोरोनाची लागण..

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 20 मार्च 2021

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

इस्लामाबाद : चीनची लस घेतल्यानंतर दोन दिवसांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. इम्रान खान सध्या होम क्वारंटाइन आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी कोविड-19 चा पहिला डोस घेतला होता. चीनने पाकिस्तानला पाच लाख डोस उपलब्ध करून दिले आहेत. 

इम्रान खान यांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल आज सकाळी आला. ते सध्या गृहविलगीकरणात आहेत. पाकिस्तानच्या आरोग्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. इम्रान खान यांनी १८ मार्चला चीनची कोरोना प्रतिबंधक लस सिनोफार्मचा पहिला डोस घेतला होता. सध्या पाकिस्तानात हाच डोस दिला जात आहे. (Pakistan Prime Minister Imran Khan Covid positive )
 
कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान घरातचं क्वारंटाइन झाले आहेत. 68 वर्षीय इम्रान खान हे सुरुवातीच्या काळात टॉप एथलिट आणि स्पोर्ट्समॅन होते. कोरोना साथीच्या सुरुवातीच्या काळात इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण झाली होती.

पाकिस्तान हे कोरोना लसीसाठी चीनवर अवलंबून आहे. पाकिस्तानात कोरोना लस निर्मित होत नाही. त्यामुळे चीन लस पाठवली तरच पाकिस्तानात लसीकरण होतं. लवकरच चीनकडून सिनोफार्म लसीची (Sinopharm Vaccine)  पाकिस्तानला मिळेल, असा विश्वास पाकिस्तानमधील रुग्णालय प्रशासनाला आहे.
 
पाकिस्तानला चीनशिवाय जागतिक आरोग्य संघटनेची कोवॅक्स ही लसही मिळण्याची आशा आहे. Who कडून गरिब आणि कमी उत्पन्न असलेल्या राष्ट्रांना ही लस पुरवण्यात येत आहे. यानुसार पाकिस्तानला 1 कोटी 71 लाख 60 हजार डोस मिळणार आहेत. सध्या पाकिस्तानातही 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे.

पाकिस्तान आतापर्यंत 623135 नागरिक संक्रमित झाले आहेत. गेल्या 24 तासात 40 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत येथे मृतांचा आकडा 13799 पर्यंत पोहोचला आहे. 

हेही वाचा : देशातील लशीच्या तुटवड्यामुळे चिंताग्रस्त पंतप्रधानांनी घेतली 'सिरम'ची लस अन् म्हणाले...
 
लंडन : ऑक्सफोर्ड व अॅस्ट्राझेनेकाच्या कोव्हिशिल्ड या लशीचे उत्पादन पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया करीत आहेत. ब्रिटनमध्ये लसीकरणासाठी या लशीचा वापर करण्यात येत आहे. मात्र, सिरमकडून पुरवठा कमी झाल्याने देशात लसीकरणाचा वेग मंदावला आहे. यामुळे चिंतित झालेले ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी अखेर ही लस टोचून घेतली आहे. युरोपमध्ये कोरोनाचे सर्वाधिक मृत्यू ब्रिटनमध्ये झाले आहेत. ब्रिटनमध्ये सुमारे 1 लाख 26 हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात कोरोना लसीकरण सुरू असून, या लसीकरणाचा वेग मंदावला आहे. याला सिरमकडून होणार लशीचा पुरवठा कमी झाल्याचे कारण आहे. कोरोना लसीकरणासाठी ब्रिटनला आणखी 17 लाख डोसची आवश्यकता आहे. सिरमकडून कमी झालेला पुरवठा आणि ब्रिटनमध्ये या लशीची पुनर्तपासणी करण्यात येत असल्याने ब्रिटनमध्ये लशीचा तुटवडा जाणवत आहे.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख