राहुल गांधींप्रमाणेच भाजपही आपली चूक मान्य करेल का..राष्ट्रवादीचा सवाल....  - now bjp should accept godhra riots was wrong says nawab malik | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सातारा : लॉकडाऊनच्या विरोधात साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पोवईनाका येथे पोत्यावर बसून भिक मांगो आंदोलन केले.

राहुल गांधींप्रमाणेच भाजपही आपली चूक मान्य करेल का..राष्ट्रवादीचा सवाल.... 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 3 मार्च 2021

राष्ट्रवादी काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला गुजरात दंगलीची आठवण करून दिली आहे.

मुंबई : कॉर्नेल विद्यापीठात एका कार्यक्रमात काँग्रेसचे नेते राहुल गांधी सहभागी झाले होते. त्यावेळी राहुल यांनी आणीबाणीबाबत मोठं वक्तव्य केलं. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लावलेली आणीबाणी ही चूकच होती, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.  याच विधानावरून राष्ट्रवादी काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला गुजरात दंगलीची आठवण करून दिली आहे. गांधी यांच्या या विधानावरून राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्तव्य केलं आहे. 

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. आज नवाब मलिक यांनी पत्रकार कक्षात प्रसारमाध्यमांची प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले,  "45 वर्षानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आणीबाबणीबाबत चुकीचा निर्णय असल्याचं मान्य केलं आहे. दिल्लीत झालेल्या दंगलबाबत माफी मागितली आहे. गुजरात दंगलबाबत भाजपची चूक असल्याचं त्यांनी मान्य केलं तर बरं होईल. आता भाजपनेही आपली चूक मान्य केली पाहिजे."  

कॉर्नेल विद्यापीठात एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी आणीबाणीबाबत मोठं वक्तव्य केलं. प्राध्यापक कौशिक बसू यांनी राहुल गांधी यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना ‘आणीबाणी घोषित करणं ही इंदिरा गांधी यांची चूक होती. मात्र, काँग्रेसनं पक्ष म्हणून त्याचा कधीही फायदा करुन घेतला नाही. तेव्हा जे झालं आणि आज जे होत आहे, त्यात मोठा फरक आहे’, असं राहुल गांधी म्हणाले. 

‘माझ्याच पक्षातील लोकांनी माझ्यावर टीकाही केली होती. पण पक्षांतर्गत लोकशाही असणं अत्यंत गरजेचं असल्याची मी पक्षातील नेत्यांना सांगितलं. आधुनिक जगात लोकशाही व्यवस्था त्यामुळेच प्रभावी आहेत. कारण, त्यांच्याकडे स्वतंत्र संस्था आहेत. पण भारतात त्याच स्वातंत्र्यावर हल्ला केला जात आहे’,  असा आरोपही मलिक यांनी केला होता. इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेतला होता.

हेही वाचा :भाजपच्या मंत्र्याचे सेक्सकँडल...येडियुरप्पा सरकार अडचणीत. 

बेळगाव : कर्नाटकमधील भाजप नेते, बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी हे एका अश्लील व्हिडिओमुळे अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या या प्रकरणामुळे कर्नाटकमधील भारतीय जनता पार्टीच्या बी एस येडियुरप्पा सरकारसमोर नवे संकट निर्माण झाले आहे. विरोधकांनी यावरून रान उठवलं आहे. दाक्षिणात्य वृत्तवाहिन्यांवर जारकीहोळी यांचा हा व्हिडिओ दाखविला जात आहे. बेंगलुरू येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. नोकरीचे आमिष दाखवून त्यांनी एका महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. बेंगलुरू येथील नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कल्लाहल्ली यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली आहे. कल्लाहल्ली यांनी सांगितले की, मी याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याबाबत चैाकशी करावी.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख