No such plan of clubbing phases in west bengal election
No such plan of clubbing phases in west bengal election

बंगालमध्ये एकाच टप्प्यात होणार निवडणूक? आयोगाकडून महत्वाचे स्पष्टीकरण

पश्चिम बंगालमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे.

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. त्यातच विधानसभा निवडणूकीचा प्रचार सुरू असल्याने सभा, रोड शोला मोठी गर्दी होत आहे. बंगालमध्ये अजूनही चार टप्पे उरले आहेत. राजकीय पक्षांकडून कोणतेही नियम पाळले जात नसल्याने रुग्णसंख्या आणखी वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

बंगालमध्ये वाढती संख्या लक्षात घेऊन तृणमूल काँग्रेसने उरलेल्या चार टप्प्यांचे मतदान एकाच दिवशी घेण्याची मागणी केली आहे. तसेच अनेकांनी बंगालच्या निवडणूकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. निवडणूक आयोगाने एकाच टप्प्यात निवडणूक घेऊन नागरिकांवरील संकट दूर करावे, अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. भाजपकडून मात्र, अद्याप यावर प्रतिक्रिया आलेली नाही.

निवडणूक आयोगाने मात्र याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ''सर्व टप्पे एकत्र करून एकाच टप्प्यात निवडणूक घेण्याचे कोणतेही नियोजन नाही,'' असे आयोगाने स्पष्ट केले आहे. तसेच बंगालच्या मुख्य निवडणुक अधिकाऱ्यांनी सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलावली आहे. निवडणूक आयोगाने कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या सुचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी कऱणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने ही बैठक महत्वाची आहे. 

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही आज एकाच टप्प्यात निवडणूक घेण्याची मागणी केली. त्या म्हणाल्या, कोरोना संक्रमणामुळे आम्ही निवडणूक आयोगाच्या आठ टप्प्यात निवडणूक घेण्याच्या निर्णयाला विरोध कले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना आयोगाने उरलेल्या टप्प्यातील निवडणूक एकाच दिवशी घ्यावी. त्यामुळे कोरोना संक्रमण वाढणार नाही, असे ममतांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा भाजपला झटका दिला आहे. वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांना 24 तास प्रचारबंदी करण्यात आली आहे. ता. 15 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजल्यापासून ता. 16 एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजेपर्यंत त्यांना प्रचार करता येणार नाही. तसेच भाजपचे नेते सयंतनू बासू यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. 

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com