हाथरसला जाण्यापासून जगातील कोणतीच शक्ती मला रोखू शकत नाही, राहुल गांधींचा निर्धार 

हाथरसमधील एका पिडित दलित युवतीच्या हत्येनंतर देशभर संताप व्यक्त केला जात आहे.
हाथरसला जाण्यापासून जगातील कोणतीच शक्ती मला रोखू शकत नाही, राहुल गांधींचा निर्धार 

नवी दिल्ली : "" कॉग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आज दुपारी पुन्हा हाथरसला जाणार आहे. मी जाणार म्हणजे जाणार. मला कोणतीच शक्ती तेथे जाण्यापासून रोखू शकत नाही असा निर्धार त्यांनी केला आहे. 

हाथरसमधील एका पिडित दलित युवतीच्या हत्येनंतर देशभर संताप व्यक्त केला जात आहे. या युवतीचा मृतदेह गावात आणल्यानंतर तिचा चेहराही तिच्या आईवडिलांना पाहून दिला नाही त्यामुळे या संतापात अधिक भर पडली आहे. गेल्या चार दिवसापासून हाथरसमध्ये तणाव आहे.

योगी सरकारने पिडित मुलीच्या आईवडिलांना कोणालाही भेट देण्यास नकार दिला आहे. तेथे 144 कलम लागू केले आहेत. कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना किंवा मिडियालाही पोलिस परवानगी देत नव्हते. त्यामुळे माध्यमातही योगी सरकारविषयी नाराजी होती. माध्यमांनी आवाज उठविताच आता कुठे योगी सरकारने पाच लोकांना जाण्याचे तेथे परवानगी दिली आहे. 

हे झाले माध्यमांचे. मात्र राजकीय नेत्यांना तशी परवानगी दिली आहे का ? हा प्रश्‍न आहे. कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावर कोणालाही गावात सोडले जात नाही. गेल्या गुरूवारी पिडित युवतीच्या नातेवाईकांची भेट घेण्यासाठी निघालेल्या राहुल आणि प्रियका गांधींना पोलिसांन अडविले होते. पोलिसांनी राहुल यांना धक्काबुक्कीही केली होती. याचा निषेध कॉंग्रेससह देशाभरातील विविध पक्षाच्या नेत्यांनी केला होता. तर दुसरीकडे भाजपला ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी घरचा आहेर दिला होता. माध्यमांना पिडित मुलीच्या नातेवाईकांना भेटण्यास परवानगी द्यावी असे मत व्यक्‍त केले होते. 

आज दुपारी राहुल, प्रियका यांच्यासह कॉंग्रेसचे काही नेते आणि कार्यकर्ते पुन्हा पिडित मुलीच्या आईवडिलांची भेट घेण्यासाठी जाणार आहेत. त्यांना आता योगी सरकार परवानगी देते की पुन्हा परत पाठविते याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. 

राहुल गांधी यांनी आज एक ट्विट केले असून त्यामध्ये ते म्हणतात, की हाथरसप्रकरणी यूपी सरकार ज्या पद्धतीने वागत आहे ते मला मान्य नाही. मी आज पुन्हा हाथरसला जाणार आहे आणि मला जगातील कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. 

ममता बॅंनर्जीही भडकल्या 
कधी अल्पसंख्याकांचा छळ, कधी दलितांचा छळ आणि काही वेळा आदिवासींचा छळ ! या कोणत्या प्रकारचा नियम असा संतप्त सवाल पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि योगी सरकारला केला आहे. 

हाथरसमध्ये एका दलित युवतीवर बलात्कार होता. तिची हत्या झाली आहे. या युवतीवर केवळ बलात्कार झाला नाही तर तिचा मृतदेह जळाला होता. याचा यूपी पोलिसांना तपास केला पाहिजे अशी मागणी करतानाच देशातील अल्पसंख्याक, आदिवासी, दलितांना लक्ष्य केले जात असल्याबद्दल त्यांनी भिती व्यक्त केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com