आसाममध्ये सत्तेत आल्यास सीएए रद्द... - No CAA in Assam if Congress is voted to power, says Rahul Gandhi | Politics Marathi News - Sarkarnama

आसाममध्ये सत्तेत आल्यास सीएए रद्द...

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 19 मार्च 2021

आसाममध्ये सत्तेत आल्यास वादग्रस्त सीएएची (citizenship amendment act) अंमलबजावणी करणार नसून रद्द करू, अशी घोषणा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केली. 

आसाम: विधानसभा निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या आहेत, तशा विविध घोषणांच्या खिरापती राजकीय नेत्यांकडून वाटल्या जात आहेत. आसाममध्ये सत्तेत आल्यास वादग्रस्त सीएएची (citizenship amendment act) अंमलबजावणी करणार नसून रद्द करू, अशी घोषणा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केली. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराकरिता गांधी आसाम दौऱ्यावर असून तेथे त्यांनी ही घोषणा केली. 

राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले, भाजपने चहाच्या मळ्यातील कामगारांना दररोज ३६५ रुपये देण्याचे आश्वासन पाळले नसून प्रत्यक्षात मात्र केवळ १६७ रुपयेच दिले जात आहेत. मी नरेंद्र मोदी नसून खोटे बोलणार नाही. आसाममध्ये सत्तेत आल्यास चहा कामगारांना ३६५ रुपये, सीएए रद्द, पाच लाख नोकऱ्या, २०० युनिटपर्यंत मोफत वीज व गृहिणींना दर महिना २ हजार रुपये पगार ही पाच वचने काँग्रेस पूर्ण करेल, असेही गांधी यांनी सांगितले. 

भाजपवर आणखी हल्लाबोल चढवताना राहुल गांधी म्हणाले, तरुणांमधील बेरोजगारी, कमी होत असलेली लोकशाही व शेतीविषयक कायदा रद्द न करणे भाजपच्याच काळात झाले आहे. आसामची संस्कृती जपली गेली पाहिजे. भारतात अनेक जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत असून विविध भाषाही बोलतात. त्या सर्व भाषांचा आदर राखला गेला पाहिजे. सद्यःस्थितीत तसे होताना दिसत नसून विद्यार्थी पंतप्रधानांशी मनमोकळेपणाने बोलू शकत नसतील, तर ही फार मोठी शोकांतिकाच आहे, असा टोलाही राहुल गांधी यांनी लगावला.  

   

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख