नितीश कुमार म्हणातात पंतप्रधानांना भेटायचे आहे; पण उद्याप उत्तर नाही!

काळजी ही वाटते की काही लोकांना जातीय जनगणनेचा त्रास होईल, जे निराधार आहेत.
  Nitish Kumar, Narendra Modi .jpg
Nitish Kumar, Narendra Modi .jpg

नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी जातीवर आधारित जनगणनेची मागणी करत सांगितले की, त्यांनी या विषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना भेटीसाठी वेळ मागितली होती. मात्र, आतापर्यंत काहीच उत्तर मिळालेले नाही. विशेष म्हणजे नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड (जेडीयू) च्या खासदरांना या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबतच्या बैठकीसाठी नकार देण्यात आला होता. त्यांना सांगण्यात आले होते की त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घ्यावी. (Nitish Kumar says he wants to meet the Prime Minister) 

नितीश कुमार म्हणाले की ''काळजी ही वाटते की काही लोकांना जातीय जनगणनेचा त्रास होईल, जे निराधार आहेत. तसेच, त्यांनी सांगितले आहे की, हे केंद्र सरकारवर अवलंबून आहे. जातीय जनगणना करायची की नाही. आमचे काम मत मांडणे आहे. हा नका विचार करू की एखाद्या जातीला हे आवडेल आणि दुसरीला नाही. हे सर्वांच्या हिताचे आहे.''

तसेच, ''समाजात कोणताही तणाव निर्माण होणार नाही. आनंद वाटेल. योजनांमुळे सर्व प्रवर्गांमधील लोकांना लाभ होईल. अशी जनगणना ब्रिटिश सरकारच्या काळतही झाली होती, असेही नितीश कुमार यांनी सांगितले. 

जेव्हा बिहार विधानसभने जातीवर आधारित जनगणनेच्या बाजून प्रस्ताव पारित करून, केंद्र सरकारला पाठवला तेव्हा कोणत्याही भाजप आमदाराने कोणताच आक्षेप नोंदवला नाही. मग नंतर काही क्षेत्रातून आक्षेप का नोंदवले जात आहेत, हे माझ्या समजण्याच्या पलीकडचे आहे. स्वातंत्र्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या नेत्यांनी युक्तिवाद केला होता की, जातीय जनगणना समजासाठी प्रतिकूल असेल, १९४७ पासून प्रत्येक जनगणनेत केवळ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींची गणनाच केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com