लवकरच देश 'टोलनाका मुक्त'; पण... - Nitin Gadkari's Big Announcement | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

लवकरच देश 'टोलनाका मुक्त'; पण...

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 18 मार्च 2021

'जेवढा रस्ता तेवढाच टोल; टोलच्या जागी जीपीएस यंत्रणा': नितीन गडकरी

नवी दिल्ली: भारत देशात सर्व टोलनाके लवकरच इतिहासजमा होणार आहेत. टोल नाक्यांवरील लांबलचक रांगांमध्ये अडकून पडण्याचे दिवसही लवकरच इतिहासजमा होतील. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत ही मोठी घोषणा केली असून येत्या एक-दोन वर्षात सर्व टोलनाके हटवण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. टोलच्या जागी जीपीएस यंत्रणा बसवण्यात येईल, असेही गडकरी म्हणाले. सर्व टोलनाके रद्द करण्याच्या योजनेवर केंद्र सरकार काम करत आहे.

नितीन गडकरी म्हणाले, "जर आम्ही टोलनाके बंद केले तर रस्ते बनवणाऱ्या कंपन्या आमच्याकडे भरपाई मागतील. मात्र सरकारने पुढील एक-दोन वर्षात सर्व टोलनाके हटवण्याची योजना आखली आहे. टोल हटवणे म्हणजे टोलनाके हटवणे, असा अर्थ आहे. नागरिकांना टोल भरावाच लागेल. सध्या सरकार अशा तंत्रज्ञानावर काम करत आहे, जिथे तुम्ही महामार्गावर प्रवेश करताच, जीपीएसच्या मदतीने तुमचे छायाचित्र काढले जाईल. जिथून तुम्ही महामार्ग सोडाल, तिथेही तुमचे छायाचित्र घेतले जाईल. याचाच अर्थ तुम्ही जेवढा रस्ता वापरला आहे, तेवढेच पैसे तुमच्या खात्यातून कापले जातील".

उत्तर प्रदेशातील अमरोहा मतदारसंघातील बसप खासदार कुंवर दानिश अली यांनी महापालिकेच्या टोलचा मुद्दा संसदेत उपस्थित केला. त्यावर गडकरींनी उत्तर दिले. गडकरींनी मागील सरकारकडे बोट दाखवत, टोलनाक्यांद्वारे मलई खाण्यासाठी असे छोटे-छोटे टोल उभारण्यात आल्याचे सांगितले. शहरांच्या सीमांवर असे टोल असणे चुकीचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

अशी आहे जीपीएस प्रणाली?
-रशियन सरकारच्या मदतीने १-२ वर्षांत संपूर्ण देश टोलनाका मुक्त होणार
-ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम जीपीएसला अंतिम स्वरूप
-जीपीएस प्रणालीतून टोल थेट बँक खात्यातून वजा होणार
-वाहनांच्या हालचालीच्या आधारे टोल वसूल होणार
-तंत्रज्ञानामुळे पारदर्शक व्यवहार, कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य

असे चालते जीपीएस सिस्टमचे काम?
-ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम सुमारे 30 उपग्रहांचे नेटवर्क
-२० हजार किमी उंचीवर पृथ्वीभोवती फिरते उपग्रह
-तुम्ही कुठे आणि कोणत्या वाहनासोबत आहात याची अचूक माहिती
-जीपीएस रिसीव्हरकडून सिग्नल रिसीव्ह करुन प्रक्रियेला सुरुवात

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख